रायगड लोकधारा न्यूज :
प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील – इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या वतीने काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिरात भव्यदिव्य वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या वर्षीचा विशेष विषय होता “अराउंड द वर्ल्ड”, ज्यामध्ये विविध देशांची समृद्ध संस्कृती सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. श्रीकांत वाड सर, सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते होते. तसेच एअर फोर्स लेफ्टनंट मा. प्रेर्णा मॅडम आणि भारतीय नौदलातील गरुड फोर्सचे मा. शैलेन्द्र सिंगजी,पत्रकार:श्री सतीश पाटील हे मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमातील हवाई कसरत (एरियल अॅक्ट) ही एक अद्वितीय आकर्षण ठरली आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संगीतनाट्य सादरीकरणाद्वारे विविध देशांची संस्कृती सादर करण्यात आली – तुर्की मधील भावस्पर्शी सुफी नृत्य आणि बेली डान्स, स्पेन मधील टोमाटिना आणि फ्लेमिंगो नृत्य, अमेरिका मधील एनर्जेटिक हिप-हॉप, आणि चीन मधील भव्य ड्रॅगन डान्स. यानंतर कार्यक्रमाने भारताच्या वैभवशाली परंपरेकडे वाटचाल केली. भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारे जोगवा नृत्य, मोहिनीअट्टम, कथक आणि भरतनाट्यम यांचा अप्रतिम संगम सादर करण्यात आला. “इंडिया वाले” गाण्यावर विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवत कार्यक्रमाचा भव्य समारोप केला, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. यातील स्टनिंग यूव्ही अॅक्ट हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला! यामध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकल्याच्या सुवर्ण क्षणांची आठवण प्रेक्षकांना झाली. भारताचा विजयोत्सव, मैदानावरील जिंकण्याची जिद्द, आणि सर्वांत खास सूर्यकुमार यादव याने घेतलेला तो ऐतिहासिक झेल—यांनी संपूर्ण प्रेक्षकदीर्घा जल्लोषाने भरून टाकली. क्रिकेट हा भारताच्या हृदयाचा ठोका आहे, जो संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणतो, आणि हा अॅक्ट त्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरला..! प्राचार्या डॉ. निकिता कोठारी मॅडम यांनी पालकांना एक सुंदर संदेश दिला—मुलांची तुलना करू नका, तर त्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करा. त्यांनी मुलांच्या जडणघडणीची तुलना एका नदीशी केली जी समुद्राला मिळण्यासाठी आतूर असते, पण उडी घेण्यास घाबरते. तसेच, वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे त्यांची व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवला जातो, जेणेकरून भविष्यात ते हिरेप्रमाणे चमकू शकतील. या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रतिभेसाठी, शिक्षकांच्या मेहनतीसाठी आणि पालकांच्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! अशाच अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक यशस्वी कार्यक्रमांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत!
