रायगड लोकधारा न्यूज :
पनवेल प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांचे अनेक वर्षांपासून बंगल्याचे स्वप्न होते. ते स्वप्न चक्क गिफ्टच्या स्वरूपात साकार झाले आहे. कामगारनेते महेंद्र घरत यांनी त्यांचे सहकारी मिलिंद पाडगावकर यांना तब्बल सव्वा कोटींचा बंगला गिफ्ट म्हणून दिला. द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत आपल्या सहकाऱ्याचा बंगला असावा, हे स्वप्न प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी साकार केले आहे. त्यांनी चक्क सव्वाकोटी रुपयांचा टुमदार ‘शार्दुल’ बंगला पाडगावकर यांना शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी भेट दिला. महेंद्र घरत यांनी आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल पाडगावकर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा बंगला पाहून मलिंद पाडगावकर यांचे आई-वडील भारावून गेले. दरम्यान त्यांना आपल्या आनंदाश्रूना आवर घालणे अवघड झाले होते. या वेळी महेंद्र घरत यांच्या पत्नी शुभांगी घरत उपस्थित होत्या. या वेळी महेंद्र घरत यांनी सपत्नीक संपूर्ण बंगल्याची पाहणी करून मनापासून पाडगावकर परिवाराला शुभेच्छा दिल्या. या बंगल्याच्या गच्चीवरून होणारे द्रोणागिरी डोंगराचे नयनरम्य दर्शन पाहून महेंद्र घरत यांनीही आनंद व्यक्त केला. या वेळी मिलिंद पाडगावकर यांच्या पत्नीने शुभांगी घरत यांची खण-नारळाने ओटी भरली. या वेळी बोलताना महेंद्र घरत यांनी, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. त्यांचीही स्वप्ने आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. परमेश्वराचा मला आशीर्वाद आहे, तो मला भरभरून देतोय, तो माझ्या मागे आहे आणि मी कार्यकर्त्यांच्या मागे आहे. पाडगावकर यांना बंगल भेट देऊन मी एका प्रामाणिक कार्यकर्त्याचे बंगल्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. आजपर्यंत महेंद्रशेठ घरव यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचे एकूण बारा बंगले बांधू-दिले आहेत. तसेच अनेकांन फ्लॅटही दिले आहेत. तर शेकड कार्यकर्त्यांना घराचे स्वप्न साका करण्यासाठी आर्थिक सहकार्यह केले आहे. या वेळी न्यू मेरिटाइम अॅण्ड जनरल कामगार संघटनेच सरचिटणीस वैभव पाटील रायगड जिल्हा इंटक अध्यध किरीट पाटील, उरण तालुक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोन म्हात्रे यांच्यासह इतर मान्यव उपस्थित होते.
