रायगड लोकधारा न्यूज :
पुणे : प्रवाशांना रिक्षा चालकांकडून बऱ्या वाईट प्रसंगाचा अनुभव येत असतो. रिक्षा चालकांची अरेरावी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. असाच एक अनुभव पुण्यामध्ये एका महिला प्रवाशाच्या वाट्याला आला. पुण्यामध्ये रिक्षा चालकाने अरेरावी केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेला रेल्वे स्टेशन परिसरात अशा प्रसंगला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे तिने सोशल मिडीयावर याविरोधात आवाज उठवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांकडून आलेला अनुभव एका तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती तरूणी रेल्वे स्टेशन परिसरात आल्यानंतर तिने काही रिक्षा चालकांना तिला जायच्या ठिकाणाविषयी संगितल्यानंतर जास्त पैशाची मागणी केली. त्यानंतर तिने मोबाईल अँपमधून रिक्षा बुक केली. यानंतर एका ऑटोचालकाने उबरवरील भाडे किती आहे, याबाबत विचारणा केली. १६० रुपये आहे असते तरुणींकडून सांगण्यात आले. यावर तो रिक्षा चालक चिडला आणि म्हणाला, “हे खूप कमी आहे, २०० रुपयांत चला माझ्यासोबत.” पण तिने स्पष्टपणे सांगितले की, तिची कॅब आधीच बुक आहे. यानंतर त्या रिक्षा चालकांने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. एवढेच नाहीतर उबरवरून भाडे स्वीकारणाऱ्या रिक्षावाल्यासोबतही त्याने वाद घातला.
