रायगड लोकधारा न्यूज :
बौद्धजन पंचायत समितीच्या महिला वर्ग यांची उपस्थिती
महाड : बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील कोट्यावधी पीडित शोषित समाजाच्या मानवी मूलभूत हक्कासाठी जिवभर अथक संघर्ष करणारे, कोट्यावधी दलित – बहुजनांचे महान उदधारक भारतीय लोकशाही राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ बाबासाहेब यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर जयंती कार्यक्रम दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता महिला मंडळ अधक्षा सुप्रिया शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भिमरावं आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्धचार्य गणेश जाधव यांच्या धार्मिक विधिने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, विनायक हाट्टे, केशव हाट्टे, अशोक साळवी, सचिव सखाराम जाधव, आदी बौद्धजन पंचायतिच्या सर्व महिला पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सौं गीतांजली साळवी यांनी मी रमाई बोलते एक पात्री एकांकिका सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम जाधव व मंजुषा धोत्रे यांनी केले या कार्यक्रमाला तालुक्यातील गाव, वाडी वस्तीतुन महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
