रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुबंई प्रतिनीधी / सतिश पाटील : अंबरनाथ एमआयडीसी मधील आनंदनगर भागात श्री गणेश केमिकल कंपनीला ९ मार्च २०२६ च्या संध्याकाळी भीषण आग लागली. रसायनांच्या साठ्यामुळे झालेल्या अनेक स्फोटांनी कंपनी जळून खाक झाली असून, आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे
अंबरनाथ आगीबद्दल महत्त्वाची माहिती :
कुठे: आनंदनगर एमआयडीसी, अंबरनाथ (पूर्व) येथील श्री गणेश केमिकल प्लांट ला आग लागली. परिस्थिती: रसायनांच्या स्फोटांमुळे आग वेगाने पसरली आणि शेजारच्या दोन कंपन्यांनाही झळ पोहोचली. अग्निशमन कार्य: अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परिणाम: आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, धुराचे काळे ढग बदलापूरपर्यंत दिसत होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र कंपनीतील केमिकलमुळे आग भडकल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पारदर्शकता: जर सर्व अटीशर्ती मान्य करून प्रणामपत्र दिले जाते तर यंत्रणाची त्रृटी आहे का असा प्रश्न उद्भवत आहे याला जबाबदार कोण वारंवार अशा घटना कशा घडतात?
