रायगड लोकधारा वृत्तसेवा :
नवी मुंबई पनवेल प्रतिनिधी : अविनाश जाधव / कळंबोली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशन भरवलेल्या टी२० विश्व कप हा भारत आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तरित्या खेळण्यात आला होता याविषयी कपामध्ये वीस संघाने सहभाग घेतला होता या विषयक रूपाचा शेवट 8 मार्च 2026 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल झाला.
India national cricket team ने टी-20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत New Zealand national cricket team वर दणदणीत विजय मिळवत. भारताने आतापर्यंत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला. ICC Men’s T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत इतिहास रचला. हा थरारक सामना अहमदाबाद येथील Narendra Modi Stadium येथे रंगला.
प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताने आक्रमक फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत २५५ धावांची भक्कम धावसंख्या उभी केली. भारताकडून संजू सॅमसंग याने धडाकेबाज फलंदाजी करत ८९ रन, दुसरा आघाडीचा फलंदाज अभिषेक शर्मा याने चेंडूमध्ये अर्धशिर्तक बनवून बाद झाला. त्यानंतर आलेल्या ईशान किशनने संजू सॅमसन ला साथ देऊन त्याने हे आपले अर्धशतक झळकावले . शेवटी शेवटी शुभम दुबे याने आठ चेंडू मध्ये 26 धावा घेऊन संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
२५६ अशा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात डळमळीत झाली. भारताचा फिरकी गोलंदाज Axar Patel याने न्यूझीलंडचा सलामीवीर Finn Allen याला बाद करत भारताला पहिली महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडला रोखून धरले. भारताचा स्टार गोलंदाज व जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपल्या स्पेन मध्ये 4 विकेट घेऊन आणि 4 षटकात अवघ्या 15 धावा देऊन या विजयात मोलाचा वाटा उचलला
न्यूझीलंडचा डाव कोलमडत अखेरीस भारताने ९६ धावांनी विजय मिळवला. या शानदार विजयासह भारताने टी-20 विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले. भारत हा 3 वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ, तसेच आयोजन केलेल्या आपल्याच देशातल्या भूमीवर जिंकलेला पहिला संघ बनला.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
