रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण : इंचगिरी रसाळ सांप्रदायाचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवचनकार ह.भ.प.श्री.कृष्णा महादेव वर्तक व सौ.कमला कृष्णा वर्तक यांचे लग्न १९७६साली तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर त्यांचे गुरु राजाधिराज शंकर महाराज रसाळ यांनी लावले. आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून रसाळ सांप्रदायाचे मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांनी या लग्नाचे धर्मशास्त्र सांगितले. ट्रस्ट अध्यक्ष ॲड.आकाश म्हात्रे, उपाध्यक्ष जयकिसन वर्तक, अशोक वर्तक, ज्ञानदेव वर्तक, मनोहर वर्तक, तुकाराम पाटील(कोप्रोली, हिराचंद म्हात्रे वढाव या सर्व कमिटी सदस्यांने या कल्पनेला प्रतिसाद देऊनसौ. कमला व श्री.कृष्णा वर्तक ज्येष्ठ गुरुबंधूचा अनेक मान्यवरांच्या व गुरुबंधूंच्या उपस्थितीत समर्थ सद्गुरु पांडुरंग महाराज यांनी आशीर्वाद देऊन लग्नविवाह सोहळा मोठे वढाव येथे उत्साहात संपन्न केला. हभप कृष्णा वर्तक हे समाजाभिमुख बहुगुणी व्यक्तिमत्त्व आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. अनेक पुरस्कार त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतले आहेत. पेण शिक्षक पतपेढीचे ते डायरेक्टर होते. सेवानिवृत्तीनंतर ही त्यांचे कार्य चालू आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटना पुरस्कार २०२४ रोजी प्राप्त झाला. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठजी पाटील यांचे नेतृत्वाने एका राजकीय मोठ्या पक्षाचा तालुका चिटणीस म्हणून पदभार सांभाळला. यावेळी अनेक तरुणांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या. शासनाची घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अशा अनेक योजनांचा गोरगरिबांना लाभ मिळवून दिला.अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम प्रवचनकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तसेच ते इंचगिरी रसाळ संप्रदाय ट्रस्ट पेण रायगड विभाग चिटणीस आहेत. सध्या अनेक मान्यता प्राप्त अशा विविध संस्थांवर ते डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळ आहेत. को.ए.सो.शिक्षण संस्था अलिबाग पेण शाखा इंग्लिश मीडियमचे ते कमिटी मेंबर आहेत. श्री पाटणेश्वर को.ऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर, शेतकरी संघटना रायगड संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटनेचे पेण तालुका उपाध्यक्ष आहेत. एक बोलक, अभ्यासू विविध गुणांनी नटलेलं चारित्रसंपन्न, व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णा वर्तक! ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या गुरूंवर व गुरुगादीवर दृढनिष्ठा आहे. अनेक तरुणांना त्यांनी या मार्गात आणून व्यसनमुक्त केले त्यामुळे त्यांचे जीवन सफल केलं. शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख या पदावर त्यांनी पंधरा वर्षे काम केले. औरंगाबाद, पुणे येथे प्रशिक्षणे घेतली. त्याचे सार म्हणून दहावी, बारावी परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना दिशा देण्याचा व आत्मविश्वास वाढविण्याचे काम गेली पंधरा वर्षे ते निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने करत आहेत. त्यांची वाणी प्रभावी आहे. त्यांचे वय ७५वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आणि लग्नाचा ५०वा वाढदिवस म्हणजेच सुवर्णमहोत्सव वर्ष असा दुग्धशर्करा योग जुळून आला. त्यांचे वय ७५वर्ष असले तरी त्यांचे कार्य एखाद्या तरुणांना लाजवेल असे आहे. आमच्या प्रतिनिधींनी विचारले तुमच्या जिवनाचं गमक काय? त्यावेळी वर्तक म्हणाले, धर्मपत्नी, रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर चार वाजता उठणे, गुरुने दिलेली ब्रह्मविद्येची एक तास साधना करणे, नंतर अंघोळ गुरुपूजा, देवपूजा, थोडं अध्यात्मिक वाचन व एक दैनिक परोपकार तुमची निष्ठा व दृढ श्रद्धा असेल तर सद्गुरू आपले काम पूर्ण करतात. आपण चिंतन करावे, आपलं इच्छित काम पूर्ण व्हावं हीच अनुभूती. वर्तकांचा जीवन हे एक चित्रपट आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बाहेरून आलेले गुरुबंधू या सप्ताहात ज्ञानेश्वरी वाचक, काकडा घेणारे गुरुभक्त व सेवा करणारे गुरुभक्त यांना वर्तक यांचे चिरंजीव लीलाधर, सुनबाई शिल्पा, कन्या हेमलता व लतिका, नातू सोहम यांनी गुरुभक्तांची पूजा करून वस्त्रदान केले. हा कार्यक्रम सकाळी आठ ते दहा या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर राजाधिराज पांडुरंग महाराज रसाळ यांनी जगदवंदनीय तुकाराम महाराज यांचे संसारी जीवन व अध्यात्मिक कार्य व वैकुंठगमन या विषयांवर आत्मचिंतनपर किर्तन करून पुष्पृष्टी केली. विंधणे गावचे उद्योगपती प्रशांत धाय जोशी यांची अनेक वर्षाची परंपरा म्हणून अन्नदान केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल सर्व भाविक भक्तांचे सांप्रदयातर्फे आभार मानण्यात आले.
