रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. २० ( विठ्ठल ममताबादे )
छत्रपती शिवाजी महाराज संघटना पुनाडे आणि देवेंद्र पाटील परिवार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव पुनाडे गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे( शिवसेना उबाटा गट ),उपोषण सम्राट अजित कृष्णा म्हात्रे ( बेलपाडा ), ए.डी.पाटील सर (सारडे ) ,एड.रुषाली पाटील, ना.क.पाटील गुरुजी,अमित पाटील (आवरे) ना.शं.पाटील गुरुजी,जयेश पाटील, गावदेवी महिला मंडळ अध्यक्षा जनाबाई पाटील,कृष्णा डाकी,कु.यश पाटील,प्रिती पाटील, संगिता डाकी,काशिबाई खार पाटील ( चिरनेर), मिना पाटील (रांजणपाडा) आदि मान्यवर महीला भगिनी, आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या शिवजयंती कार्यक्रमाला ना.क.पाटील गुरुजी,एड.रूषाली पाटील,ए.डी.पाटील सर, ना.शं.पाटील गुरुजी ह्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती उपस्थितांना आपल्या भाषणातून दिली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देविदास पाटील ह्यांनी केले.पुनाडे गावात सलग ५ वर्षे देवेंद्र पाटील आणि परिवार निस्वार्थ पणाने सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. तसेच उरण तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे. सर्व मान्यवारांच्या हस्ते त्यांच्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अशा प्रकारे पुनाडे गावात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न झाला.


