रायगड लोकधारा वृत्त :
विन्हेरे विभागात उबाटाला जोरदार धक्का… उबाठाच्या सरपंचासह सदस्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश _
महाड प्रतिनिधी : येत्या काही दिवसात आणखी तीन ते चार गावांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार
उबाटा पक्षामध्ये राहून आमचे कोणतेही काम होत नाहीत
नामदार गोगावले यांचा विकासाचा झंजावात पाहून आम्ही उबाटाला राम राम केला
सापेगावच्या सरपंचा सह ग्रामस्थांचा उबाठा च्या कार्यप्रणालीवर आक्षेप…
विनेरे विभागातील सापे गावातील सुकुम भावकी सह ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश
सध्या राज्यात शिवसेनेमार्फत ऑपरेशन टायगर जोरदार सुरू असून महाडमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर आणि विकास कामांचा धडाका पाहून महाड मतदार संघात दररोज ऑपरेशन टायगर राबवले जात आहे आज दिनांक 9 मार्च रोजी महाड तालुक्यातील विनेरे विभागातील सापेगावच्या सुकुम आळी येथील उबाटाच्या. सरपंच रिंकल सुकुम, ग्रामपंचायत सदस्य आनंद चुकूम, पायल सुकुम, प्रिन्स सुकुम, जगन्नाथ सुकूम, ज्योती सुकुम, अनिकेत सुकुम, महेश सुकुम, मैथली सुकुम, खुशी सुकुम, रणजीत सुकूम, रजनी सुकूम, रमेश सुकुम, राकेश सुकुम, अंकुश कदम, सपना कदम, सतीश सुकुम, सुरज आराव, अनंत शि.सुकुम, गणेश भा.सुकुम, सुनील सुकुम, सुशीला सुकुम, सुशील सुकुम, साजन सुकुम, मनोहर बैकर, दत्ताराम डावरुंग, दर्शना डावरुंग, रीना सुकूम इत्यादींनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख रोहिदास आंबवळे, शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, माझी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, विनेरे विभाग प्रमुख आनंत सावंत , उपविभाग प्रमुख संतोष पवार, इत्यादींसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना सांगितले की सदर प्रवेश कर्त्यांनी विधानसभेला आम्हाला निवडणुकीत सहकार्य केले परंतु आज त्यांनी मनाने शरीराने आणि विचारांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे. आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला मिळत आहे सुकुम आळी ने आज तो जाहीर रित्या पक्षात प्रवेश केला.


