रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि २४ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात मोठया प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहेत. यातच चोरांना, आरोपीना शोधणे हे पोलीस प्रशासनासाठी एक आव्हानच आहे. यातच पोलीस प्रशासनाने एक महत्वाची कामगिरी करत उत्तम कामगिरी करत आरोपीना शोधून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.तांत्रिक विश्लेषांनानुसार व मिळालेल्या महत्वाच्या सूत्रा द्वारे तपास करून पोलीस प्रशासनाने चोरीच्या गुन्ह्यातील महत्वाच्या आरोपीना अटक केली आहे.ईसम नामे शरद भारत सांगोलकर, वय २९ वर्षे, राहणार वाकी घेरडी, तालुका सांगोला,जिल्हा सोलापूर.दुसरी व्यक्ती संजय तमा निमगरे, वय ३४ वर्षे, राहणार वाकी घेरडी, तालुका सांगोला,जिल्हा सोलापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून उरण पोलीस स्टेशन गु.र.न 07/25,उरण पोलीस स्टेशन गु.र.न 08/25, उरण पोलीस स्टेशन गु.र.न 282/24,उरण पोलीस स्टेशन गु.र.न 331/24,पनवेल तालुका पोलीस स्टेशन गु.र.न 08/24,एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल त्याचे इंजिन क्रमांक 03A18M23221 सदर वाहने चोरी झाल्या होत्या.वरील प्रमाणे ०६ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ०६ मोटरसायकली असा १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांतर्फे हस्तगत करण्यात आला आहे. तपास पथक- सपोनि नितीन खाडे व पथक पोउपनि संजय राठोड व पथक यांनी विशेष तपास करून गुन्हेगारांना पकडले.सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,न्हावा शेवा पोर्ट विभागचे सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल नेहुल, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.याबाबत अधिक तपास व कार्यवाही सुरु असल्याचे जितेंद्र मिसाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलिस ठाणे यांनी सांगितले आहे.
