रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड तालुक्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेत अमूल्य खर्चात फायदा घेता यावा म्हणूनच महाडमध्ये प्रथम गोरगरिबांच्या सेवेसाठी संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्याचे उद्घाटन रविवार दिनांक 30 3 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुनकर, माजी नगरसेवक सुनील अग्रवाल या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रमोद राजे खंडागळे डॉक्टर अक्षता खंडागळे डॉक्टर शेखरदाभडकर डॉक्टर चेतन सुर्वे डॉक्टर प्रदीप मेहता डॉक्टर महेंद्र मेहता रमेश गिरामकर जि. प. सदस्य अलिबाग डॉक्टर मंजुषा कुद्रमोती सागर लगड श्रद्धा लगड मोहनशेठ रोहनशेठ डॉक्टर नितीन देशमुख डॉक्टर राजेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हॉस्पिटलचा खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.


