रायगड लोकधारा वृत्त :
कडसरी लिंगाणा वाडीतील उबाठा युवा सेना शाखाप्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश…..
शिवाजी वाळण मधील नागरिकांनी देखील सोडली उबाटाची साथ…
महाड प्रतिनिधी : आम्ही काम करतोय त्याचा मोबदला आहे, वैयक्तिक लाभासाठी गेलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर कोणी जायला तयार नाहीआपण कुठपर्यंत नेत्याच्या मागे धावायच, आता आपण विकासाच्या प्रवाहाला मिळायचं… करसडी लिंगाणा वाडीतील नागरिकांनी ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्या पक्ष बदलू भूमिकेवर केली नाराजी व्यक्त.
शिवसेना पक्षाच्या वतीने ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आले आणि हे ऑपरेशन टायगर महाड मतदार संघ मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळतय राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री यांनी आपल्या मतदारसंघात तर ऑपरेशन टायगर चा धडाका सुरू केला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गावातील नागरिक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. त्यातच महाड मतदार संघात ठाकरे गटाला लागलेली गलती थांबता थांबत नाही. ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सुनील तटकरे यांचा हात धरला आणि राष्ट्रवादीत दाखल झाले मात्र हे मतदार संघातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पचणी पडले असे दिसत नाही . आता दररोज ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. असाच एक पक्षप्रवेश काल हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर महाड मतदार संघातील पाणी गावातील कडसरी लिंगाणा वाडी ने प्रवेश करत घडला आहे जवळपास संपूर्ण कडसरी लिंगाणा वाडीने शिवसेना करत असलेल्या विकासाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे .
हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी शिवसेना महाड तालुका संघटक संजय शिंदे यांनी आता प्रयत्न केले आहेत. लिंगाणा करसडीवाडी येथील नागरिकांनी आणि सुरत स्थित नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशावेळी शिवसेना महाड तालुका संघटक संजयशेठ शिंदे, माजी जि.प. सदस्य संजय कचरे,शिवसेना उपतालुका प्रमुख प्रभाकर मोरे, शिवसेना वाळण विभागप्रमुख भगवानपवार,शिवसेना वाळण उपविभागप्रमुख अशोक शिंदे,शिवसेना वाळण विभाग संपर्कप्रमुख गणेश मोरे, शिवसेना वाळण विभाग संपर्कप्रमुख नामदेव उत्तेकर, युवासेना जि. प. संपर्कप्रमुख अमर जंगम, युवासेना वाळण विभाग प्रमुख सचिन मोरे, युवासेना वाळण इत्यादी उपस्थित होते.

