रायगड लोकधारा वृत्त :
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून युवकांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा होणार.
उरण प्रतिनिधी : सारडे येथे दमदार आमदार महेशशेठ बालदी यांच्या प्रयत्नातून व्यायाम शाळेसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या व्यायामशाळेचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक ८/५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित प्रमुख मान्यवर रविशेठ भोईर (उरण विधानसभा अध्यक्ष भाजप) यांच्या शुभहस्ते पार पडला. मुकुंद बबन गावंड (उरण तालुका उपाध्यक्ष भाजप), राणीताई म्हात्रे (उरण तालुका महिला आघाडी अध्यक्ष), धनेश गावंड (उरण तालुका ग्रामीण अध्यक्ष), प्रसाद भोईर (उरण तालुका शहर अध्यक्ष), देवेंद्र पाटील (उद्योगपती), निलेश म्हात्रे (युवानेते), प्रशांत ठाकूर (चिरनेर पंचायत गण अध्यक्ष), अजित पाटील (आवरे पंचायत गण अध्यक्ष), मुकेश म्हात्रे (युवा नेते), अमित पाटील (भाजप गाव अध्यक्ष पाले), के. वाय.गावंड (ग्रामपंचायत सदस्य पिरकोन), रोशन पाटील (सरपंच ग्रामपंचायत सारडे), जीवन पाटील (उपसरपंच सारडे), अमित म्हात्रे, महेश पाटील, अस्मिता म्हात्रे, प्रतिक्षा पाटील (ग्रामपंचायत सदस्य), सुवर्णा पाटील, श्रीमती संचिता गोंधळी (ग्रामपंचायत अधिकारी), महेश पाटील, सत्यवान पाटील (ग्रामपंचायत कर्मचारी), नागेंद्र म्हात्रे (सारडे विकास मंच अध्यक्ष), मनोहर पाटील सर, संदीप पाटील (माजी सरपंच सारडे), भार्गव म्हात्रे (माजी सदस्य), निशिकांत पाटील, रुपम पाटील, हितेश म्हाते, बळीराम पाटील, तुळशीराम पाटील, विनोद पाटील, हरिश्चंद्र पाटील, श्रीधर म्हात्रे, जगजीवन पाटील, गोपीचंद पाटील, संकेत पाटील, अजिंक्य पाटील, बालकृष्ण पाटील, प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, हेमंत पाटील, राकेश शिंदे, मयूर माळी, समाधान पाटील, सुशील पाटील, प्रितेश पाटील, वृषभ पाटील, हरेंद्र म्हात्रे, सर्व युवा कार्यकर्ते भाजप सारडे) तसेच सर्व सारडे ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सारडे येथे युवकांना दर्जेदार व अत्याधुनिक सेवा सुविधानी युक्त असे व्यायाम शाळा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उपलब्ध होणार असल्यामुळे गावातील युवकांनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील युवकांनी, ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे जाहीर आभार मानले आहेत.
