रायगड लोकधारा वृत्त :
पाक व्याप्त काश्मीर (POK) : प्रतिनिधी / कांतीलाल पाटील : पहलगाम हल्ल्याचा कट कसा रचला ते आपण पाहूया
१) ०२ फेब्रुवारी २०२५ ला लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ कमांडर सैफुल्ला कसुरी कडून स्वतंत्र काश्मीरची घोषणा करण्यात आली .
२) फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीरला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची घोषणा सैफुल्ला कसुरीने केली.
३) फेब्रुवारी २०२५ मध्ये सैफुल्ला कसुरीची अबू मुसा, इदरीस शाहीन, मोहम्मद नवाज,अब्दुल्ला रसूल आणि अब्दुल खालिद यांच्या सोबत बैठक पार पडली.
४) मार्च २०२५ मध्ये पाक व्याप्त काश्मीर POK येथील मिरपुर,खंबल येथे बैठक बोलण्यात आली आणि त्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट रचला गेला.
५) ११ मार्च २०२५ ला सैफुल्ला कसुरीचा पाक व्याप्त काश्मीर POK मधील मिरपुर चा दौरा झाला दहशतवादी संघटनांच्या म्होरक्या सोबत बैठक पार पडली.
६) मार्च २०२५ मध्ये पुन्हा लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याची बैठक झाली आणि हल्ल्याची तारीख आणि अंतिम नियोजन पार पडले.
७) १८ एप्रिल २०२५ ला लष्कर ए तोयबाच्या पाच हि अतिरेक्यांची सभा झाली आणि या सभे मधून पहलगाम हल्ल्याचा इशारा दिला.
८) पहलगाम हल्ल्याचा मास्टर माईंड लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ कमांडर सैफुल्ला कसुरी ला पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी तसेच ISI च्या अधिकाऱ्यांनी मदत केली.
९) सैफुल्ला कसुरीने वारंवार POK चा दौरा केला आणि त्याने लष्कर ए तोयबा, हिजगुल्ल मुजाहिद्दीन आणि इतर दहशतवादी संघटना आणि POK येथील कमांडर यांच्या वारंवार गाठीभेटी घेतल्या.
१०) बैसरन येथे बैठक घेऊन पहलगाम येथे हल्ल्याची तारीख २२ एप्रिल २०२५ निश्चित केली.
