रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण मध्ये पहिल्यांदाच अशा उपक्रमांचे आयोजन.
उरण दि. २० ( विठ्ठल ममताबादे ) : “स्वच्छ पर्यावरण हा मानवाचा मूलभूत अधिकार आणि ते सुदृढ राखणे हे आद्य कर्तव्य” या विचारनुसार २२ मे या जागतिक स्थलांतरित पक्षी दिवसाचे औचित्य साधून सदर कांदळवन स्वच्छता अभियान हे सागरशक्ती, महाराष्ट्र वनविभाग, भारतीय नौदल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन आणि गव्हाण कोळीवाडा मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. उरण मध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. २२ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० वाजता या वेळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त सामाजिक संस्था संघटना, पर्यावरण प्रेमी संस्था संघटनानीं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
