⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. २५ विठ्ठल ममताबादे : भिलकटी येथील भूमीपुत्र सध्या भांडुप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मुंबई प्रभादेवी कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य मा. श्री सी .पी. राधाकृष्णन राज्यमंत्री कामगार महाराष्ट्र राज्य अँड. आकाश फुंडकर, राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार अँड. आशिष जयस्वाल ,प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग आय ए कुंदन (भा. प्र. से) यांच्या शुभहस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र पुस्तक,शाल, फेटा, रोख रक्कम पंचवीस हजार देऊन मोठ्या थाटामाटात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी मा. तुकाराम मुंढे (भा. प्र.सो) विकास आयुक्त मा. डॉ. एच.पी . तूमोड कामगार आयुक्त कल्याण रविराज इळवे, संजय थोरात ज्येष्ठ पत्रकार,प्रभाकर कांबळे, राजकुमार कांबळे,अरुण कांबळे आशिष कांबळे,नितीन खरात, कांबळे शारदा शिरसाट यांनी निवडीबद्दल राजेंद्र कांबळे यांचे अभिनंदन व कौतुक केले.प्रत्येक वेळेस साथ देणारे म्हणजे पत्नी शुभांगी कांबळे व मुलगी साक्षी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य व साथ दिल्याने राजेंद्र कांबळे हे यशस्वी झाले हे मान्य केले.राजेंद्र कांबळे यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व ठिकाणी सहभागी असल्याने त्यांना हा अष्टपैलू ठरवण्यात आले. त्यांच्या कार्याची कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य अँड .आकाश फुंडकर यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कांबळे यांचे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आला त्याबद्दल सर्वत्र कांबळे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
