⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण दि. २५ विठ्ठल ममताबादे : उरण तालुक्यातील चिरनेर मधिलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मधुकर म्हात्रे(४९)यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या घरातील कर्ता हरपल्याचे दुःख त्यांच्या कुटुंबियांवर कोसळले असून चिरनेर विभागात मोठ्या प्रमाणात शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईक मित्रमंडळीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
मागील १० ते १२ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षासाठीआवश्यक लागणारे दाखले त्याच प्रमाणे गरीब गरजूच्या रेशनकार्डसह तहसिलदार कार्यालयातील विविध कामे निस्वार्थी पणाने करणारे रविंद्र म्हात्रे यांची प्रत्येकाशी सौजन्याने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण होती.
नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे त्यांची पत्नी,वडील,भाऊ,दोन मुलगे आणि दोन सासुरवाशीण बहिणी असा त्यांचा परिवार आहे.
