⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कांतीलाल पाटील : जेजुरी,दि.२८ : जेजुरी गडावर देवाच्या अंगणात नुसते पाणीच पाणी. पाणी धबधब्यासारखे ओसांडून वाहत होते. जेजुरी गडावर तुफान पाऊस बरसत आहे. पावसामुळे पायऱ्यावरून पाणी धबधबा सारखे वाहत आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना हे नयनरम्य दृश्य अनुभवता आले आहे. जेजुरी गडावर गेल्या आठ दिवसापासून तुफान पाऊस होतोय.जेजुरीत काल रात्री मुसळधार पाऊस झाला.
