⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कामचुकार व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर, डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी.
कोप्रोली आरोग्य केंद्रात चांगल्या सेवा सुविधा मिळण्यासाठी शिवसेनेने उठविला आवाज
उरण दि. १४ विठ्ठल ममताबादे : उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देऊन डॉक्टर व सुविधांची पाहणी केली.प्राथमीक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे एकूण ४ डॉक्टर ची नेमणूक केलेली आहे परंतु दि १२/६/२०२५ रोजी दिवसभरात ९२ पेशंट आलेले आसताना एकही डॉक्टर तिथे हजर नव्हते.सदर डॉक्टरांबाबत तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचारी यांना शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचारणा केली आसता एकही डॉक्टर नसल्या बाबत सांगण्यात आले. या अगोदर २० दिवस अगोदरच सदर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे तक्रार अर्ज जिल्हा वैदकीय अधिकारी अलिबाग यांचे कडे केले असता आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही. मुळात महत्वाचे म्हणजे कोप्रोली प्राथमिक रुग्णालयाला २ कोटी चा निधी उपलब्ध करून दिला असून सदर रुग्णालयामध्ये नवीन मशिनरी आणि हायटेक ऑपरेशन थिएटर ची बांधणी करायची आहे अशी माहिती जिल्हा वैदकीय अधिकारी कार्यालय अलिबाग यांचे कडून मिळाली परंतु त्या बाबतीत देखील कोणतेही काम चालू दिसत नाही. सदर वेळी शेवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी सभापती विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे , माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील , कोप्रोली शाखा प्रमुख रवींद्र म्हात्रे, एडवोकेट पर्जन्य म्हात्रे , सामाजिक कार्यकर्ते नंदन म्हात्रे , कोळीवाडा अध्यक्ष महेश कोळी , सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक धनेश म्हात्रे उपस्थित होते.कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स हे उपलब्ध नसतात. तसेच तेथे पारदर्शक कारभार नसल्याने नागरिकांनी, ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा गैरसोयीमुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो. शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या कार्य पद्धती मुळे कोणत्याही व्यक्तीस प्राण मुकावे लागण्याची शक्यता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात बळावली आहे. त्यामुळे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून सदर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

