⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
महाड प्रतिनिधी : २६ जून हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जयंती दिन वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग या माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. कुर्डुनकर आर एम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक श्री गंगाधर साळवी सर यांचे शुभ हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिवादन केले. यावेळी आर्यन पवार व श्रावणी देवळे या विद्यार्थ्यांनी हिंदीमध्ये तर रोशन शिंदे, सलोनी परब व विघ्नेश मोरे या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. विद्यालयातील गीत मंचातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला. श्री गंगाधर साळवी सर यांनी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक, वसतिगृह विषयक असलेले काम उदाहरणे व प्रसंग सांगून कथन केले. श्री गणेश कोळी सर यांनी देखील या दिनाविषयी माहिती दिली. श्री दीपेश जाधव सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मीनाक्षी राऊत मॅडम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सहाय्यक शिक्षिका सौ घरटकर ए ए मॅडम, लेखनिक श्री बर्वे एस एस, श्री गायकवाड एस के इत्यादी उपस्थित होते.
