⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
सुखालागी करीसी तळमळ ।। तरी तु पंढरीशी जाय एकवेळ ।। मग तु अवघाची सुखरूप होशी ।। जन्मोजन्मीचे दुःख विसरशी ।। म्हणजेच जन्मोजन्मीचे दुःख विसरण्याची ताकद पंढरीच्या वारीमध्ये आहे.
फलटण प्रतिनिधी : आषाढ महिना आला की वारकऱ्यांच्या मनामध्ये पंढरीच्या वारीचे वेध लागतात. आपल्या उपास्य देवतेला भेटण्याची ओढ त्यांच्या अंतःकरणात असते. प्रपंचातील सर्व कामे बाजूला ठेवून ते आषाढी यात्रेला पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण होतात.
पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील; परंतु अत्यंत दृढभाव असणारा आहे. कारण पंढरपूरचा देव हा भावाचा भुकेला आहे त्याला बाकी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही.
आषाढी पायी वारी निमित्त फलटण येथे “रोजगार हमी संवाद वारी” माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले.
पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची प्रतीक असलेली परंपरा आहे. याच वारीत राज्याच्या रोजगार हमी विभागाच्या एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. “रोजगार हमी संवाद वारी”
रोजगार हमी योजना मंत्री म्हणून मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये रोजगार हमी योजना विषयक जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, माहितीपूर्ण पथनाट्य, मोबाईल वॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके, व्हिडिओद्वारे चित्रफित द्वारे माहिती दिली जात आहे.
दरवर्षी १०० दिवसांचा रोजगार, देईल कुटुंबाला आधार.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान ” १०० दिवसांच्या रोजगाराची हमी” देते. तसेच हे उद्दिष्ट ठेवून गावातल्या १८ वर्षांवरील गावकऱ्यांकडून विविध कामे पार पाडून गावाचाही विकास साधत आहे.
सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिनांक १९ जून पासून वारी बरोबर प्रारंभ झालेला या संकल्पनेसाठी चित्ररथ असून लोकांची टीम यामध्ये सहभागी झाले आहे. दिनांक १९ जुलै आषाढी एकादशी पर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे.
चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रे, वारकरी परंपरेचे दर्शन, तसेच रोजगार हमी योजना वैयक्तिक व सार्वजनिक कामांची माहिती चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.
वारीत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन प्रमुख पालख्यांच्या मागोमाग गावागावातील लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत असतात. ही संपूर्ण वारी जिथे भक्तिभाव, कीर्तन, रिंगण, अभंग गजरात रंगलेली असते, तिथेच ही “रोजगार हमी संवाद वारी” माहिती घेऊन आपले कार्य करत आहे.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श : या उपक्रमातून केवळ रोजगार हमी योजना माहितीच नव्हे तर १०० दिवस रोजगाराची हमी
रो. ह. यो योजनेअंतर्गत एकूण २६६ कामे अनुज्ञेय असून सदर कामांची प्रामुख्याने ४ प्रवर्गात विभागणी करण्यात आलेली आहे. वैयक्तिक सार्वजनिक कामे करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे यासंबंधी देखील प्रबोधन करण्यात येत आहे. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या सहभागाचा उत्कृष्ट संगम आहे. भविष्यात यासारख्या संकल्पना इतर मोठ्या जनसमुदाय असलेल्या धार्मिक वा सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील राबविण्याची आवश्यकता आहे.




