🔴 रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. ३१ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावाच्या हद्दीत वसलेल्या यु एल ए गोदामातील जे एम बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक प्रकल्पाच्या देवकृपा सर्व्हेअर मधील सुमारे १५० कामगारांना तब्बल १२८०० रुपयांची भरघोस पगारवाढ देण्याचा करार द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेचे डॅशिंग कामगार नेते रवि घरत यांच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आला आहे. वेतन करार हा कामगारांचा कायदेशीर हक्कच आहे आणि तो मिळवून देताना आम्हा कामगार नेते मंडळींना कंपनी ही टिकली पाहिजे आणि कामगार देखील जगाला पाहिजे या आमचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आम्ही काम करीत आहोत आणि त्याला यश येत आहे हे कामगारांच्या एकीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन कामगार नेते रवी घरत यांनी केले आहे
या वेतन करारा बाबत बोलतांना देवकृपा फ्रेट सर्व्हेअर कंपनीचे मालक मिलिंद पाटील म्हणाले की जे एन पी ए बंदर परिसरात अनेक प्रकल्पामध्ये कामगार नेते रवी घरत यांनी मागील अनेक वर्षांपासून वेतन करारांचा धडाका सुरू ठेवला आहे कामगारांच्या हितासोबतच कंपनीच्या अस्तित्वाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन ते कामागारांसाठी वेतन करार करीत असतात ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तर हा वेतन करार म्हणजे येथील कामगारांना मिळालेली खूप मोठी दिवाळी भेट असून कामगार नेते रवी घरत यांच्या याच कामगार हिताच्या धोरणामुळेच या परिसरातील मोठ्या प्रमाणातील कामगार त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याची प्रतिक्रिया युनिट अध्यक्ष प्रवीण भोईर यांनी दिली आहे. अतिशय आक्रमकतेपणे कामगारांची न्याय बाजू मांडल्यामुळे अवघ्या साडेपाच महिन्याच्या कालावधी मध्येच हा वेतन करार होऊ शकला याबाबत कामगारांनी समाधान व्यक्त करून कामगार कायद्यांचा गाढा अभ्यास आणि प्रशासनाला योग्य प्रकारे हाताळण्याची कसोटी असलेले कामगार नेते रवि घरत यांच्या मुळेच हा वेतन करार यशस्वी रित्या संपन्न झाल्याचे म्हणणे कामगारांनी मांडले आहे आणि त्या बद्दल आनंद देखील व्यक्त केला आहे.कामगार नेते रवी घरत त्यांच्या सांतत्याने कामगारांची बाजू अगदी रोखठोकपणे सहाय्यक कामगार आयुक्तांपर्यंत देखील मांडण्याच्या द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेच्या बेधडक भूमिकेमुळेच या संघटनेकडे कामगारांचा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणातील ओघ वाढताना दिसत आहे. हा वेतन करार करताना कंपनीच्या वतीने एच आर मॅनेजर श्री. जोशी , कामगार नेते रवी घरत,देवकृपा चे मालक मिलिंद पाटील , कामगार प्रतिनिधी युनिट अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह कामगार प्रतिनिधी निलेश पाटील,दिनेश म्हात्रे,अनिल ठाकूर,चेतन घरत,कवीश ठाकूर, केसरीनाथ पाटील,निशांत पाटील आदी उपस्थित होते तर अनिल ठाकूर यांनी यावेळी आभार मानले आहेत.या वेतन करारमुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
