Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी : उरण तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या भेंडखळमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी (ता. २) कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त विठू माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी भेंडखळच्या विठ्ठल-रखुमाई देवस्थान मंडळाच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांना शाळ, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्तिकी भागवत एकादशी निमित्ताने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या भेंडखळ गावात दरवर्षीप्रमाणे कार्तिकी भागवत एकादशीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी भजन, कीर्तन आणि विठ्ठल-रखुमाईच्या भव्य पालखीचे आयोजन भेंडखळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी परिसरातील हजारो भक्तांनी विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठूरायाचे दर्शन घेतले. उरण परिसराला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. तसेच महेंद्रशेठ घरत यांना उरण या हुतात्म्यांच्या नगरीविषयी आदर आहे. या कार्यक्रमासाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार नरेश म्हात्रे, ओबीसी सेलचे दीपक ठाकूर, भेंडखळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश ठाकूर, पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर, महाराष्ट्रप्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, भेंडखळ काँग्रेस अध्यक्ष प्रमोद ठाकूर तथा यशवंत म्हात्रे, नाशिकेत म्हात्रे, सुरेश ठाकूर, मनोहर ठाकूर, राजा घरत, मनीष ठाकूर, साई पाटील, जयेंद्र ठाकूर, सचिन भोईर, प्रांजल भोईर, अमोल ठाकूर, नरेंद्र ठाकूर, प्रणव ठाकूर, नीरज ठाकूर, संदीप म्हात्रे, पियुष ठाकूर, अभिमन्यू ठाकूर तथा ग्रामस्थ मंडळ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनेयावेळी उपस्थित होत्या.
