🔴 रायगड लोकधारा वृत्त :
दि. १४ नोव्हेंबर २०२५
उरण प्रतिनिधी / विठ्ठल ममताबादे : उरण शहरातील देऊळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ब्राह्मण सभेचे सभासद, देऊळवाडीतील विठ्ठल मंदिराचे पुजारी,एनएडीचे अधिकारी शेखर गणपत लाळे यांचे बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. शेखर लाळे हे प्रेमळ, मनमिळावू,सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व होते.एनएडी मध्ये ते मोठया हुद्द्यावर कामाला होते.ज्योतिषी व आध्यात्म यात त्यांचा दांडगा अभ्यास होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी जीवनातील बऱ्याच गोष्टीबद्दल जनतेला,नागरिकांना मार्गदर्शन केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य देखील होते. सर्वांना उपयोगी पडणारे व्यक्तिमत्व असलेले शेखर लाळे यांचे दुःखद निधन झाल्याने लाळे परिवार, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.शेखर लाळे यांच्यावर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उरण,पनवेल तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील नातेवाईक, मित्रपरिवार ब्राह्मण सभा उरण,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देऊळवाडी युवक मंडळ, देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, एनएडीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेखर लाळे यांच्या सारखी चांगली व्यक्ती निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्ती प्रमाणे जगणारे शेखर लाळे यांच्या जाण्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.
