उरण दि. १९ / विठ्ठल ममताबादे : सध्या सर्वत्र क्रिकेट स्पर्धा सुरु असून जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडाच्या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते बुधवारी (ता. १९) करण्यात आले.यावेळी जासईचे सरपंच संतोष घरत, सदस्य आदित्य घरत, भूषण म्हात्रे, धुतूमचे उपसरपंच प्रेमनाथ ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर ठाकूर, इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, पनवेल युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, रमेश पाटील, राजेश ठाकूर, अंगद ठाकूर आणि रांजणपाडा ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
