🔴 रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनिधी / सतीश पाटील : श्री दत्तगुरु प्रतिष्ठान आयोजित दत्त जयंती (वर्ष:76) प.पू.अमृतनाथ महाराज सेवा मंडळ दत्तगुरु को-ऑ. हौ. सो.ली. मुलुंड प. जवाहरलाल नेहरू रोड 28 नोव्हेंबर ते 5डिसेंबर 2025 पर्यंत कीर्तन आठ दिवस अविरत कीर्तन सप्ताह, दररोज पहाटे 6ते 7 वाजता आरती होते तसेच शेवटच्या दिवशी पालखी शोभायात्रा व काल्याचे किर्तन महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो.
दत्त जयंती उत्सव महायाग गेले (25) वर्ष साजरा होतो.
शांती कॅम्पस मुलुंड पश्चिम मुंबई 80 सुंदर रांगोळी, दिपोत्सव, भक्तीमय भजनाचा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक मान्यवर दर्शनासाठी येत असतात. भंडारा व महाप्रसाद याचा लाभ घेतात.
—————————————————————
सोना दत्तगुरु सेवा मंडळ मुलुंड रेल्वे स्टेशन प. मु.
अध्यक्ष रामदास सोनवणे ( आप्पा ) यांच्यावतीने गेली (36) वर्ष श्री दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. तसेच श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते सर्व राज राजकीय प्रतिनिधी आणि मुलुंड पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग, मान्यवर यांची उपस्थिती असते. सर्व मान्यवरांचा सत्कार केला जातो दर्शनाचा लाभ घेतात. ( मुंबई पत्रकार ) श्री. सतीश पाटील यांचा सत्कार केला जातो जय गुरुदेव दत्त!
