रायगड लोकधारा न्यूज :
पनवेल, वार्ताहर : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आज सकाळी जवळपास साडे सातच्या सुमारास विचूंबे परिसरात काही अवैध गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक औषध प्रशासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. त्याची किंमत जवळपास 20 लाख असून याबरोबर एक दुचाकी सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मज्जाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्त वार्ता कोकण विभाग उत्तरेश्वर बडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पनवेल मधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला 20 लाख 6 हजार किंमतीला गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुटखा पान मसाला अशा तंबाखू युक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल व माल पोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
Related Stories
November 24, 2025
November 17, 2025
