रायगड लोकधारा न्यूज :

ठाणे प्रतिनिधी : दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ४ वाजता कळवा ठाणे येथे हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ आयोजित करण्यात आला होता. या हळदी कुंकू कार्यक्रम समारंभाला संस्थेच्या अधक्षा सौ वंदना ताई गौरी यांचा सत्कार संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री संतोष म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बचत गट अध्यक्ष मीना गौरी, सचिव मोनाली घरत खजिनदार अश्विनी कारंडे भुमी कन्या आणि भुमी पुत्र सामाजिक सेवा संस्था अध्यक्षा आणि भुमी कन्या बचत गट सल्लागार वंदना गौरी प्रमुख पाहुणे म्हणून भुमी कन्या ऍडव्होकेट प्रमुख मान्यवर चेतन कीणी मॅडम, भुमी कन्या आणि भुमी पुत्र सामाजिक सेवा संस्था कळवा ठाणे प्रमूख सल्लागार श्री संतोष म्हात्रे,संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट वीरा म्हात्रे पाटील, आणि प्रमुख अतिथी श्री अनिल दादा गावंड विश्वस्त मरू आई मंदिर ट्रस्ट माटुंगा,आणि कळवा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी देखील उपस्थित होत्या.
