🔴 रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी : असंघटीत क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र कोणते असेल तर ते आहे बांधकाम. त्यावर अवलंबून असणारे इतर घटक पाहिले तर त्या एकूण कामगारांची संख्या ही लक्षवेधी ठरते. पण ह्या सर्व क्षेत्रातील कष्टकरी कामगार एकत्र येत नाही. हिच मोठी चिंतेची बाब आहे. तरी मी नाका कामगार, घर कामगार यांना संघटित करण्यासाठी १९८२ पासून काम करीत आहे. आज पर्यंत अनेक कामगार कार्यकर्ते झाले. कार्यकर्त्यांचे नेते झाले आणि तेच त्या कामगारांना दोष देण्याचे काम करीत असतात. महात्मा ज्योतिबा फुले रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची कामगार चळवळ ही आज ही एका ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम करतांना दिसत नाही. इतर गोष्टींवर जास्त लक्ष देते. त्यामुळेच ती यशस्वी घौड दौड करतांना दिसत नाही. आणि ती पूर्णपणे अयशस्वी झाली असे ही म्हणता येत नाही. म्हणूनच तमाम असंघटीत क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो.
एक मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, “मॅडम, आता मी शाळेत येणार नाही. ”प्रिन्सिपलने विचारले “पण का?” मुलगा म्हणाला ” मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले. आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत. कर्मचारी चांगले नाहीत. विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात….(जसे असंघटीत कष्टकरी कामगार नेहमी एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानतात.)
प्रिन्सिपल ने उत्तर दिले “ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम कर. एका काचेच्या प्यालात पाणी घ्यायचं आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मार व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड” मुलाने विचार केला. हे खूप सोपे काम आहे! प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली. जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले.
प्रिन्सिपलने विचारले “जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का? त्या तरुणाने उत्तर दिले, “नाही.” ”सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?” “नाही” “शिक्षक शिकवताना पाहिले का?” “नाही” तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की
“तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास. आपल्या आयुष्याचेही असेच आहे.जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो.”
आपन काय शिकलो?.
आपले ध्येयावर लक्ष असावे. इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या…
म्हणुनच आपल्याला काय गाठायच आहे हे लक्षात ठेवायच मग ईतरांच्या चुका काढायला वेळच मिळणार नाही. काय बरोबर ना? गेली अनेक वर्ष आम्ही असंघटीत नाका कामगार घर कामगार महिलांना संघटित करण्यासाठी झटत आहोत. पण ते जातीच्या प्रश्नांवर ज्या पद्धतीने संघटित होतात. त्या पद्धतीने कष्टकरी कामगार म्हणून संघटित होत नाही म्हणूनच त्यांची संख्या मोठी लक्षवेधी असून ही त्यांना समान वेतन समान न्याय मिळत नाही. त्यांना कामगार म्हणून मान्यताच नाही. ते जसे असंघटीत कामगार आहेत तशाच त्यांना संघटित करणाऱ्या कामगार नेत्यांच्या संघटना असंघटीत आहेत. त्यांना ही मी असंघटीत कामगार सुरक्षा परिषद, तर कधी असंघटीत कामगार संघटना कृती समिती, आणि आता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती स्थापन करून सर्वात मोठ्या क्षेत्रातील असंघटीत कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती, प्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी फुले लोखंडे, आंबेडकर,पेरियार रामासामी यांच्या विचारांचा वारसा घेऊन सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. त्याग, कष्ट करून जिद्दीने असंघटीत कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई लढत आहे. त्याला ध्येयावर लक्ष ठेऊन काम करणाऱ्यांनी साथ द्यावी. नांवासाठी काम करणारे कामगारांमध्ये विश्वास निर्माण करू शकत नाही. ते इतर गोष्टींवर लक्ष वेधून कामगारांना न्याय देऊ शकत नाही. ते आपला उदरनिर्वाह कसा करावा यांची चिंता करतात. ते असंघटीत कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत नाही. त्यांच्या पासुन असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सावध रहावे. आणि असंघटीत कामगारांना संघटित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे व त्यालाच प्राधान्य द्या. जगात ज्या काही क्रांत्या झाल्या त्या कामगारांनीच केल्या असा इतिहास आहे. मग आपल्या असंघटीत क्षेत्रातील कष्टकरी कामगारांची संख्या ९३ टक्के आहे. या पैकी ३० टक्के कामगारांना संघटित केले तर राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आपल्या हाती आहे. म्हणूनच शासन यंत्रणेवर कायम स्वरुपी दबाव निर्माण करण्याचे ध्येयावर लक्ष केंद्रित करा. इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा व त्यालाच प्राधान्य द्या…तर आपण शासन कर्ती जमात बनू शकतो.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९ / अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती. स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र राज्य.
