रायगड लोकधारा न्यूज :

पनवेल : प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून कल्पतरू रिव्हर साईड येथील रहिवाशांनी स्पोर्ट्स वीकच्या माध्यमातून एकत्र येत नागरिकत्वाचे उत्कृष्ट संदेश दिला. कल्पतरू रिव्हर साईडमधील बिल्डिंग नंबर १, २, ३, ४ आणि वॉटर फ्रंट या पाच वसाहतींमध्ये मिळून ८४० सदनिका आहेत. दरवर्षीप्रमाणे सोसायटीमध्ये आयोजित होणाऱ्या स्पोर्ट्स वीकमध्ये यावर्षी ५ ते ७० वर्षे वयोगटातील ३४२ खेळाडूंनी उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समितीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाला. यावेळी बिल्डिंग १ आणि २ चे चेअरमन प्रशांत बाळाराम ठाकूर, बिल्डिंग ३ आणि ४ चे चेअरमन ब्रह्माजी, मनोज आंग्रे, भार्गव रामदास ठाकूर, सीमा ठाकूर, पूजा सिंग, सप्तमी साहा, प्राजक्ता पाटील, आशा पॉल यांच्यासह पदाधिकारी आणि सोसायट्यांमधील रहिवासी उपस्थित होते.
