रायगड लोकधारा न्यूज :
मुलुंड : प्रतिनीधी : श्री.सतिश विष्णू पाटील :-
मुख्यमंत्री आदेशानुसार त्याच्या शिष्टमंडळातील काही अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर तसेच मंत्रिमंडळातील अधिकारी लाल दिव्याची गाडी घेऊन थेट कु.शर्वरी म्हात्रे ही निवास स्थानी भेट दिली.त्यांनी शर्वरीच्या पुढील वाटचालीबद्दल आईवडील यांच्या बरोबर चर्चा केली .
मुर्ती लहान पण किर्ती महान अशी तीची ख्याती आहे
अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीने १२१ हून अधिक अवघड किल्ले सर केले छत्रपतींचा इतिहास जाणून घेण्याची तीची तळमळ इतरांना प्रेरणादाई ठरेल यंदा २६ जानेवारीच्या संध्येला सर्वांत उंच कठीण लिंगाणा किल्ल्या सर करत आणखी एक विक्रम रचला अशाच धाडशी पराक्रमामुळे शर्वरी महाराष्ट्र हिरकणी व जागतिक विक्रमवीर म्हणून ओळखले जाते तिला लाभलेले संस्कार कमी वयात गडकिल्ले सर करणारी आगरी समाजाचे नाव उज्ज्वल करणारी व आपला पराक्रमी इतिहास जपण्याचा एक छंद जपणारी कु.शर्विका म्हात्रे ही चिमुकुली आहे तीच्या कुटुंबासोबत आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, एँड. महेश मोहिते व पनवेल शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.




