रायगड लोकधारा वृत्तसेवा :
दिनांक : 26 फेब्रुवारी 2026
मुंबई प्रतिनिधी / सतिश पाटील : महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे (MRPM ) अध्यक्ष, व फळ, फुल. भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे (PPBVFSS) अध्यक्ष तसेच सेंट्रल रेल्वे सल्लागार कमिटी सदस्य ( ZRUCC Member ), रेल्वे मंत्रालय,मा.श्री.अभिजीत धुरत याच्या मुख्य उपस्थितित गुरुवार २६ फ्रेबुवारी २०२६ रोजी भांडूप रेल्वे स्टेशन मॅनेजर धनाजी देसाई याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. २३/८ / २०२४ रोजी महासघातर्फे भांडुप रेल्वे टर्मिनस व्हावे सर्व जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्यांना थांबा व भांडुप दिवा सावतवाडी गाडी सुरु करण्यासाठी उपोषण करण्यात आले त्याचा पाठपुरावा करण्यात आला व इतर भांडुप रेल्वे प्रवाश्याच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली .यावेळी महासंघाच्या चाईल्ड सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेणूकाताई साळुंखे, भांडूप स्टेशन अध्यक्ष सुनिल करपे सचिन नागवेकर मनोज सावत सदानंद तांडेल सतिश पाटील (मुंबई पत्रकार) तसेच इतर पदाधिकारी वं रेल्वे प्रवाशी उपस्थित होते.



