रायगड लोकधारा वृत्त :
मुलुंड प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील : इंडूरन्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित खोपोली येथे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी दिवसा आणि रात्री प्रकाशझोतात स्पेशल स्केटिंग रिंकवर इंडूरन्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२४-२५ संपन्न झाली. या स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये स्पीड कॉड, स्पीड इनलाइन, रिक्रेशनल स्केटर्स महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक इत्यादी राज्यांमधून आले होते , ह्या स्पर्धेत दिव्यांग स्केटर्स सुद्धा सहभागी झाले असून जवळपास ८०० च्यावर स्केटर्स सहभागी झाले होते. या चॅम्पियनशीपमध्ये टिटवाळा कल्याण शहरातील कु.जस्मिन संदेश पाटील हिने १ मिनिट आणि २ मिनिटांच्या रेसमध्ये १२ वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन सिल्वर मेडल्स पटकावले आहेत. पुढे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जस्मिन पाटील ही कोळी समाजातील असून ती मूळची मुंबई मधली आहे. ती सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन मेडल पटकावत आहे.

