उरण प्रतिनिधी : (विठ्ठल ममताबादे ) – : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग,जासई ता. उरण जि.रायगड, या विद्यालयात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.सी.बोर्ड नवी मुंबई,वाशीचे पर्यवेक्षक मनोहर पवार हे खुद्द उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भयमुक्त व कॉपीमुक्त कसे सामोरे जावे तसेच परीक्षा कालावधीत कोणती प्रमुख खबरदारी घ्यावी, याविषयी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे एम.के यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि कामगार नेते सुरेश पाटील यांना लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद मार्फत दि.बा.पाटील योद्धा हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे महत्त्व विषद करून बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन अरुण जगे हे होते.त्यांनी आणि रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.