रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. २१ ( विठ्ठल ममताबादे ) : शिवजयंतीचे औचित्य साधत उरण तालुक्यातील जासई येथील हिंदूरक्षक मित्र मंडळ जासई व ग्रामस्थ मंडळ जासई यांच्या संयुक्त विद्यमाने जासई मध्ये शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता जासई नाका ते छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल पर्यंत ढोल ताशाच्या गजरात, लेझिमचे नृत्य करत पालखी व मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पारंपरिक वेशभूषा करण्यात आली होती. विविध मर्दानी युद्धचे प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी दाखवले. सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल प्रांगणातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवाणुकीची सांगता करण्यात आली.यावेळी नरेश घरत (माजी सभापती), संतोष घरत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते ),संतोष घरत (सरपंच जासई),संजय ठाकुर,धर्मा पाटील, माणिक म्हात्रे,निर्मला घरत, बाबूराव मढवी,संतोष आत्माराम घरत,माणिक घरत, तुषार घरत,विनायक घरत, वीणा घरत,यशवंत शेठ घरत,रमेश पाटील, हिंदू रक्षक मंडळाचे गोविंदा घरत , गुरुनाथ घरत,आदित्य घरत अक्षय घरत , श्रेयस घरत, आदित्या भोसले , समर्थ पवार,शुभम म्हात्रे, सावित्रीबाई महिला मंडळचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू रक्षक मित्र मंडळ जासई व ग्रामस्थ मंडळ जासईच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.










