रायगड लोकधारा वृत्त :
मुलुंड प्रतिनीधी :श्री.सतिश वि.पाटील
11वर्षीय कु.स्वराज सोनाली संतोष पाटील यांने मोरा (उरण) ते गेटवे ऑफ इंडिया हे समुद्री 12 कि मी चे पहाटे अंतर 4:30 तासात पार करून 4:00 वाजता समुद्रात मोठ्या हिंमतीने झेप घेऊन पार केले यांच्या या शौर्याचे कौतुक उरण पंचक्रोशीत तसेच सर्व स्थरांतून होत आहे पहाटे4:00 वाजता आम्ही साखर झोपेत असताना अंधारात व गार पाण्यात स्वतःला झोकून देणे खूप जिगरबाज काम आहे या कौतुकास्पद कामगिरीत कु.स्वराज चे गुरू,आईवडील, नातेवाईक व चाहते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून त्याचे मनोबल वाढण्यास मदत केली पालकांनी मुलांना वेडेवाकडे नाचने ,रिल बनवणे या पेक्षा खेळात पारंगत कसे होतील यावर भर द्यावा कु.स्वराज सारखे आणखी साहसी पट्टीचे तैरात आपल्या समाजात तयार होण्यास मदत होईल अभिनंदन स्वराज पुढील वाटचालीस.


