रायगड लोकधारा वृत्त : आज आपण आमच्यात नाहीत असं कसं म्हणू मी आपण लिहिलेले साहित्य अजरामर आहेच, पण त्याबरोबर आपण दररोज आम्हाला सदैव जागरूक ठेवत आहात. आज आम्ही आपली फक्त जयंती साजरी करत आहोत, पण मराठी मुलखावर यवनांची नाही , तर इतर भाषा आणि भाषिकांचा इतका पगडा बसलाय की प्राकृत मराठी पण आम्ही विसरलो की काय, की आम्हीच मराठीचा गळा घोटत आहोत याची भीती वाटत आहे. याला बऱ्याच प्रमाणात राजकीय वातावरणसुध्दा तितकेच कारणीभूत आहे, कारण यांचा वेळ सद्या याला फोड, त्याला फोड, याला आत मध्ये घाल, त्याला बाहेर काढ यांच्यातच वेळ आणि पैसा खर्च होत आहे. प्रत्येक मराठी माणूस खेकडावत्तीने वागतोय.
अटकेपार झेंडा लावणारे तथाकथित सरदार अटकेला घाबरून मराठी माणसं एकमेकांना खाली खेचत आहेत. दिल्लीश्वरांुढे सपशेल लोटांगण घालताना मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळणार ही सल मनात आहे. आता तर कहरच झाला आहे अमर्याद सत्ता आणि संपत्तीने सगळ्यांचेच माथे फिरले आहे. दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये लोक-प्रतिनिधी दोन मराठी माणसे गोळ्या घालताना, पाहताना मराठी भाषेने काय आत्महत्या करायची का ? तुम्हीच म्हणता ” आकाशपण हटता हटत नाही, मातीपण मिटत नाही, आकाश मातीच्या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही ‘. असं असेल तर पसरला कर कधी मागायला दान स्वर्ण सिंहासनापढे कधी लवली ना मान.
हा मराठी बाणा, ताठ कणा गेला कुठे ?
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. अगदी सूचक असे काव्य मराठी मनात कायमचं कोरलं गेलं आहे. माझी मराठी भाषा ही माझ्या माऊली इतकीच प्रिय व तितकाच गोड अवीट वैभवशाली तरीही नम्र म्हणूनच ती सर्वांचीच माऊली. मराठी भाषलाच इतर अन्य भाषांची सुद्धा माऊलीच म्हटलं जाते ते उगाच नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वर सद्धा माऊलीच उच्चारण करतात. ती ज्ञानगंगा आहे. अनेक संत सजन्नांनी तिचे वर्णन किंवा तिला समद्ध करण्याचे प्रयत्न केले . काहींनी मराठी भाषेचे कलात्मक सौंदर्य प्रकट केले तर काहींनी संसाराचे किंवा गहश्रमातील कर्तव्य. ब्रह्मचर्येत असताना ज्ञानोपासना कशी असावी यासंबंधी विवेचन स्पष्ट केले तर काहींनी निसर्ग, पर्यावरण याचं संतलन कसे असावे याचा विचार मांडला. खरं म्हणजे सद्यस्थितीतील ज्ञान विज्ञान याची मुळ कारणे किंवा पाया जर पाहिला तर असे दिसून येईल की मराठी भाषेतील अनेक शब्द किवा साहित्य हे अक्षर वाडमय या स्वरुपात होते आणि राहिल. हे सर्व समृद्ध साहित्य हे एका कालखंडात लिहीले गेले होते आणि त्यानंतर काही वरषांनी जसा मानवाच्या रहाणीमानावर परिणाम आणि संपूर्ण जगाचा जगाशीच संबंध यायला लागला. आधुनिक (औद्योगिक क्रांती ) हा महत्वाचा टप्पा मानवाच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा मानला गेला. कारण अनेक शब्द अनेक विचार हे औद्योगिक क्रांतीमुळे नवीन जन्माला आले आहेत. त्यामुळे मानवाच्या जीवनात अमुलाग़ग्र बदल निरमाण झाले. मनुष्य हा केवळ बाह्य रंगानेच बदलला नाही तर त्याची भाषा बदलली आणि भाषेच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेल्या. ज्यावेळी इंग्रज प्रथम भारतात आले तेव्हा त्यांनी प्रथम काय केले असेल तर त्यांनी आपली मराठी भाषा अवगत केली कारण त्यांचे पाहिले पाऊल मराठी मुलखातच पडले. इतकेच काय यवनांच्या स्वाऱ्या जरी झाल्या तरी त्यांना समृद्ध असा महाराष्ट्च आवडला दिब्ली ही राजकिय आणि भौगोतिक दृष्टया कितीदा सुरक्षित वाटली तरी मराठी मुलुख त्यांना सांस्कृतिक आणि नितीमुल्य जपणारा, शूर साहित्य क्षे्रात वैभवशाली असा महाराष्ट्रच उपयक्त वाटला म्हणनच दाही दिशातून परकीय आक्रमणे जी झाली ती महाराष्टावरच धडकली मग यांनी प्रथम काय केले तर प्रयत्न मराठी मुलखात लक्ष घालून मराठी भाषा अवगत केली मराठी माणसांना जवळ केले. त्यांची भाषा अवगत केली छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा इतिहास हा खंडरुपी ग्रथ जम्स ग्रॅट डफ या इग्रज आधिकाऱ्याने लिहिले असो तर त्यांनी मराठीचे वैभव जाणले आणि आपण फक्त इंग्रजाळलो असे खेदाने म्हणावे लागले मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्न ध्मानुयायानी असु | हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेड्ू | वसे अमुच्या मात्र हृदयमंदिरी असे म्हणणारे आम्ही चार सुशिक्षित मराठी माणसे एक आली की इंग्रजीत संवाद करतो. आईला आई आणि डॅड डीलांना बाबा म्हणायची लाज वाटते. आता तर मम्मी-डॅडी च्याही पुढे गेलो आहोत. ‘ हाय डॅड आणि हाय मॉम ‘ पर्यंत हे प्रकरण येऊन ठेपले आहे. ही समद्द्धीची वद्धी की पोकळ सूज म्हणायची याचा विचार करण्याची वेळ कधीच संपली आहे. हाच मोठा अर्थ आहे की, यातूनच आपण सर्वांनचि मराठीसाठी पेरते व्हा’ म्हणायची पाळी आली आहे.
यासांठी अगदी पुरातन काळापासून ज्ञानेश्वर तुकारामांचे अभग, बाहिणाबाईंच्या जात्यावरील ओव्या, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक जे मनाला शुद्धीकरण करण्यास (सुदृढ बनवण्यात ) खूप उपयोगी पडतात. याचे जाहिर वाचन पठण आणि प्रवचने करण्याची नितांत गरज आहे थोर संत ज्ञानेश्वरापासून ते अगदी अलिकडे कुसुमाग्रज, अत्रे, फडके, स्वा. सावरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निघालेले साहित्य, प्रबोधनकारांचे सामाजिक प्रबोधनावरचे विचार जयंत नारळीकर यांचे विज्ञानानिष्ठ विचार पुलचे निखळ सात्विक विनोद हे सर्व साहित्य कालौघात नष्ट होता कामा नये, आचार विचारातून सुसंस्कृत देवाण- घेवाण हवीच पण संपूर्ण जगाने जगभरातील भाषिकांनी आपली स्वतःची भाषा जपली॰ एखाद्या देशाचा पंतप्रधान परदेशात गेला तरी तो स्वतःच्या भाषेत बोलतो आणि त्याचा दुभाषक त्यांचे भाषांतर करून साऱ्या जगाला ऐकवतो.
मराठी भाषिकांनी हा प्रगल्भ विचार का करू नये किमान चार मराठी माणसं (उच्च विद्याविभूषित ) एकत्र आली की का इग्रजाळलेली असतात याचं भान ठेवायला हवे. फक्त मराठी ढोल बडवून आणि नऊवारी साड्या नेसून उत्सव साजरे करू नयेत ते तर हवेच पण काही शब्दांची देवाण- घेवाण अराठी भाषिकांना करुन द्यायलाच हवी. फक्त मराठी पाट्या बदलून थांबणे गरजेचे नाही. आतील मालकही मराठी हवा त्यानेही रोजचा व्यवहार मराठीच करावा असा केवळ कायदा नको ही जाणीव हृदयातन हवी ठेच लागली की आई म्हणतो पुढे संकट आले की बापरे म्हणतो इतकंच मराठी नको.
प्रत्येकाने रामदास स्वामींचे मनाचे श्लोक एकत्र सामुदायिक पठण व्हावे त्यांनी अगोदर मनाला सांगितले आहे. आधी मन करा रे शुद्ध मग भगवंत आपोआप हृदयाच्या राहिल गाभाऱ्यात इतकं समद्धीपर्ण ससंस्कत विचारांचे लेणं आपल्या मराठी भाषेत आहे. त्याला जीर्ण होऊ ने देणे हे प्रत्येक पिढीच कर्तव्य आहे. याची सोपान परंपरा चालवत आपणच या दिंडींचे वारकरी व्हावे हेच या क्षणी मनोमन वाटते. जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की जगात बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा नंबर दसरा आहे आणि मराठी भाषेला अशिजात दर्जा नुकताच मिळाला पण अशिजात म्हणजे नेमके काय ? तर मराठी सारस्वतांनो मराठी भाषा अभिजात आहेच॰ फक्त आता कागदपत्री तीच मूल्यमापन झाल॰ राजकीय संद्भ, श्रेय वाद कुणीही घेवोत पण मराठीत उत्तमोत्तम साहित्य, ग्रंथनिर्मिती तसेच अनेक विषयांवर दर्जेदार लिखाण होणे गरजेचे आहे. नवोदित लेखकांना केवळ पुरस्कारच नाही तर पुस्तक निर्मितीचा खर्च सवलती शुल्कात सरकारने भार उचलने गरजेचे आहे. म्हणजेच लेखकांचा दर्जा कितीही अप्रतिम असला तरीही निर्मिती मूल्य कमी होणे गरजेचे आहे.
याचा सर्वच थरांवर म्हणज राजकीय सामाजिक पातळावर व्हायला हवा. तात्यासाहेब आज आपल्या जन्मादिनी मराठीचाच गजर स्वत्रीक सर्वदूर व्हावा हीच मनोमन इच्छा. पुन्हा पन्हा आभिवादन….!
आपला : राजन वसंत देसाई
सर्वादय बिल्डिंग ना. गो. कष्ण गोखले रोड,
दादर (पाश्चिम ), मुंबई – ४०० ०२८
भ्रमणध्वनी : ८७७९९८३३९०
