रायगड लोकधारा वृत्त :
मुलुंड प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवराय चौकात साजरी करण्यात आली. यनिमित्त संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये रक्तदान शिबीर साई ब्लड बँक पनवेल, आरोग्य शिबीर मेडिक्युअर हॉस्पीटल खारघर तर्फे घेण्यात आले.महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध सेक्टर मधील 25 महिला सहभागी झाल्या होत्या. प्रथम क्रमांक से 15 येथील सौ सेजल खराडे मॅडम, द्वितीय क्रमांक से 21 मधील कु. नेहा मॅडम आणि तृतीय क्रमांक नालासोपारा मधील श्रीमती ऊषा रमेश म्हात्रे मॅडम यांचा आला. शिवजयंती निमित्त वाचन संस्कृती वाढावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे रयतेसाठीचे केलेले कार्य लोकांना कळावे म्हणून केतकी पब्लिकेशन फोर्ट मुंबई यांच्यामार्फत ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री ठेवण्यात आली होती यावेळी लेखक पंकज चाळके यांच्या शिवबाचे मावळे आणि संपादक श्री चंद्रकांत जाधव यांच्या *संत तुकाराम महाराज निवडक अभंग या पुस्तकांचे अनावरण पुरंदर -स्नेह ग्रंथसंग्रहालय चे संस्थापक अध्यक्ष श्री संजय जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. जाधव साहेब यांनी यावेळी वाचन संस्कृती टिकवण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यानीं सध्या चालू असलेल्या संघर्ष मार्फतच्या दारूबंदी संदर्भात चळवळीचे सामाजिक प्रबोधन आणि जनतेला त्यातील लढ्या बाबत मार्गदर्शन आणि सामील होण्यासाठी आवाहन केले.यावेळी लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देत दारूबंदी चा नारा दिला शिवप्रेमी आणि वाचकप्रेमी यांनी यावेळी प्रदर्शन मध्ये ठेवण्यात आलेल्या विविध पुस्तके खरेदी करून चांगला प्रतिसाद दिला. शिव आधार संस्थेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या शांतिदूत आखाडा लाठी काठी प्रशिक्षण केंद्राच्या मुलांनी उत्तम प्रात्यक्षिक सादर करून सर्वांची मने जिंकली. महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम ठेवण्यात आला यामध्ये जवळपास 150महिला सहभागी होत्या. रक्तदान शिबिरात 32रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबीर आणि नेत्रतपासणी शिबिरात देखील लोकांनी सहभाग घेतला. संस्थेतर्फे *शिवभोजन* ठेवण्यात आले होते यामध्ये जवळपास 750 लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला. कार्यक्रमास पनवेलचे भा ज पा चे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच सर्व पक्षातील राजकीय व्यक्तींनी भेट दिली आणि संस्थेस सहकार्य केले त्याबद्दल संस्थेने त्यांचे सर्वांचे आभार मानले. मुलांसाठी रस्सीखेच स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. संस्थेतर्फे प्रसिद्ध भजन सम्राट महादेव बुवा शहाबाजकर यांच्या भजन संध्या कार्यक्रम चे आयोजन केले होते.संस्थेस कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित TWJ कंपनीचे मोलाचे योगदान लाभले त्यांचेही आभार मानले खारघर पोलिसांनी योगदान दिले यामध्ये महिला पोलिसांनी रक्तदान केले खारघर पोलिसांनी संस्थेचे कौतुक केले ते यासाठी की ही संस्था नेहमी गाजावाजा न करता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित शिवजयंती साजरी करते. अशाप्रकारे शिवजयंती उत्सव शिव आधार सामाजिक संस्थेने मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व शिवप्रेमी, वाचकप्रेमी, रक्तदाते, आरोग्य शिबिरातील डॉक्टर, कर्मचारी महिला, मुले, जेष्ठ नागरिक,देणगीदार विविध क्षेत्रातील मान्यवर, कंपन्या यांचे संस्था आभार मानते. संस्था सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद आपले शिव आधार सामाजिक सेवा संस्था सेक्टर 11, खारघर



