रायगड लोकधारा वृत्त :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सहविचार सभा. व नवीन कार्यकारणी निवड
महाड प्रतिनिधी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांची सहविचार सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल येथे सायंकाळी तीन वाजता समितीचे अध्यक्ष संतोष हाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रायगड जिल्हा महिला प्रमुख सुनीता गायकवाड मुकुंदराव पाटणे भागुराम साळवी सखाराम जाधव विनायक हाटे केशव हाटे प्रभाकर खांबे अशोक मोहिते योगेश कासारे एडवोकेट बिपिन साळवी दीपक मोरे विजय साळवी मोहन खांबे लक्ष्मण जाधव दीपक कासारे शशिकांत कासारे सौ अमृता वाघमारे दीपेश भाऊ जाधव समितीचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते यावेळी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या आढावा सर्वांसमोर जाहीर करण्यात आला सर्वानीमुते याला पाठिंबा देण्यात आला 2025 च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय साळवी सचिव दीपक साळवी कोषाध्यक्ष गंगाराम भोसले सहसचिव अरुण गायकवाड अशा सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीचे सूत्रसंचालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे सचिव आनंदराज गाडगे यांनी केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2024 जयंती उत्सव समितीची बैठकीची सांगता झाली.
