रायगड लोकधारा वृत्त :
अविनाश जाधव कळंबोली वार्ताहर : रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या 5 कोटी 35 लाख 34 हजार 771 रुपयांचा वेतन घोटाळ्याची चौकशी पोलिसांमार्फत सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शासनाने पारित केले आहेत. व्ही. राधा अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, यांचेकडील आदेशानूसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, नेहा भोसले यांनी नवीन पदाचा कार्यभार डॉ. बास्टेवाड यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे आदेशीत केले आहे. याशिवाय डॉ. भारत बास्टेवाड यांना नागपूर येथे रोजगार हमी योजनेत नियुक्ती देण्यात आली आहे.
आज दि. ०३/०४/२०२५ रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेहा भोसले यांनी आज आज या पदाची सूत्रे हाती घेतली. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बाष्ठेवाड यांनी कार्यभार त्यांच्याकडे सुपूर्त केला. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
