रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे :- प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे एन. सी. डी. किट वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्या वेळी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण चे डॉक्टर बाबासो काळेल,तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे, सिद्धिविनायक हॉस्पिटल चे डॉक्टर पाटील सर, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी कोप्रोलीचे जेष्ठ नागरिक जनार्धन म्हात्रे, गंगाबाई म्हात्रे व इतर ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.ज्यांना ज्यांना डायबेटीस (शुगर ), ब्लेड प्रेशर (बीपी )आहे अशा रुग्णांनी या एनसीडी किटचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणात घेतला.एनसीडी किट गोर गरीब रुग्णांना खूप मोठे वरदान ठरत आहे.
नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत N.C.D. किट्स पुरविणे
रायगड जिल्हयाची लोकसंख्या सुमारे २६३४२०० इतकी आहे. रायगड जिल्हयामध्ये ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८० उपकेंद्रे, ०७ जिल्हा परिषद दवाखाने व ०३ प्राथमिक आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील औषधे देण्यात येतात. सदयस्थितीत आरोग्य विभागाकडुन प्राप्त होणारा शासकीय निधी व राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) निधी मधुन औषधपुरवठा करण्यात येतो. रायगड जिल्हयास प्राप्त होणा-या निधीतुन अपुरा औषधपुरवठा उपलब्ध होत असल्याने उच्चरक्तदाब व मधुमेह आजारावरील रुग्णांना काही दिवसांसाठी औषधपुरवठा करण्यात येतो ज्यामुळे ग्रामीण भागातील, आदिवासी पाडयातील रुग्णांना वारंवार औषध प्राप्त करुन घेण्यासाठी शासकीय दवाखान्यात यावे लागते. तथापि औषधपुरवठा कमी असल्याने रुग्णांना आवश्यकतेनुसार सदर आजारांचे औषधी वेळेवर न मिळाल्याने आजाराचा सामना करावा लागून रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाययोजना म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड शासन कल्पनेतून नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील उपचारासाठी तीन महिन्याच्या कालावधीसाठी आगाऊ (Advance) औषध पुरवठा अंसंसर्गिय आजार किट (NCD Kit) व्दारे पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(अ) आर्थिक तरतुद
१) जिल्हा नियोजन समितीकडील उपलब्ध निधी,
२) राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत प्राप्त,
३) जिल्हा परिषद सेस फंड : रायगड जिल्हयामध्ये उच्चरक्तदाव रुग्ण ३४०४७ व २१३९९ मधुमेह आजाराचे असे एकूण ५५४४६ रुग्ण असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे. जिल्हा नियोजन समिती व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त होणा-या निधीतून औषध पुरवठा कमी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होते त्यामुळे कमी पडणारा निधीची तरतुद येणा-या आर्थिक वर्षापासुन जिल्हा परिषद सेस फंडातुन करण्यात येत आहे. पुढील वर्षिच्या अर्थसंकल्पात रुपये १.२५ कोटीची तरतुद करण्यात आलेली असुन आवश्यकतेनुसार यामध्ये वेळोवेळी वाढ करण्याची उपायायोजना करण्यात येत आहे.
(ब) योजनेचे फायदे : १) रुग्णांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आगाऊ औषधसाठा प्राप्त होणार असल्याने वेळेवर औषध घेवुन आजारावर नियंत्रण ठेवता येईल तसेच त्यांच्या वारंवार दवाखान्यातील फे-या कमी होतील.
२. रुग्णांना येण्याजाण्याचा खर्च, कामात व्यत्यय येणार नाही. पर्यायाने आर्थिक बचत होईल.


