रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनिधी : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, मंगळवारी (8 एप्रिल 2025) काही भागातील पाणी पुरवठा खंडित होणार आहे. नेमक्या कोणत्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे तसेच कोणत्या वेळेत आणि किती काळासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवणार आहेत ?
जाणून घ्या…
नेमक्या कोणत्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ?
मुंबईतील एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील 600 इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. या कारणाने जुनी जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार (8 एप्रिल 2025) रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कारणास्तव ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे – कुर्ला संकूल परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
कोणत्या वेळेत पाणी पुरवठा बंद ?
मंगळवार, 8 एप्रिल 2025 रोजी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. सायंकाळी 5 ते 7.30 या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. या जलवाहिनी विषयक कामकाज झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.
आवश्यक पाणीसाठा करुन ठेवा
संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईकरांना कुठून आणि कसे होते पाणी ?
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी तसेच राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा अशा एकूण सात धऱणांतून पाणी पुरवठा केला जातो. या सात जलाशयांद्यवारे मिळून मुंबईला दररोज 3950 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणांमधील पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात येत असते. या धरणांतील पाणीसाठा वापराबाबत राज्य सरकार निर्णय घेत असते. इतर धरणांतील पाणीसाठा खूप खालावल्याने राखीव धरणांतील पाणी वापरले जाते.
