रायगड लोकधारा वृत्त :
महाड वरंध भोर पुणे घाटात सापडलेल्या शिवलिंग सदृश्य शिवलिंगाची मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केली पाहणी
नक्कीच शिवलिंग आहे की काय? याची तपासणी करून घेऊन पुढची व्यवस्था करू :- मंत्री भरतशेठ गोगावले
महाड प्रतिनिधी : महापरल महाड वरंध मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या कामाचे रुंदीकरण माझेरी गावच्या हद्दीत सुरु असताना एका पावसाळ्यात पडणाऱ्या धबधब्या जवळ खोदकाम करत असताना जवळपास दहा ते पंधरा फूट आत मध्ये गेल्यानंतर अचानक या ठिकाणी एका दगडाचा आकार हा शिवलिंग याप्रमाणे आणि त्याच्या चारी बाजूने पोकळ जागा असल्याने हे शिवलिंग असाव अशी धारणा माझेरी गाव वरंध गाव त्याच पद्धतीने या घाटातून जाणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त केली जात असून या ठिकाणी शिवभक्तांनी पूजा आरचा देखील सुरुवात केली आहे आज राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे आपल्या नियोजित पारमाची गावच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी या शिवलिंग सदृश्य शिवलिंगाची पाणी केली आहे यावेळी बोलत असताना नामदार गोगावले यांनी सांगितले की या दगडाचा आकार शिवपिंडी सारखा दिसत आहे, त्याच पद्धतीने ही शिवपिंड समोर आल्यानंतर या ठिकाणाहून दोन नाग बाहेर पडले असे या ठिकाणी खोदकाम करणाऱ्या ठेकेदारामार्फत सांगण्यात येत आहे त्यामुळे सदर शिवपिंड सदृश्य शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असे सांगितले आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीज कर, महाड विधानसभा संपर्कप्रमुख राजेश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
