रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी चवदार तळे महाड येथील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह वलंग नवीन प्रवेश मार्गदर्शन शिबिरास पालक आणि मान्यवरांचा चांगला प्रतिसाद लाभला. संस्थेचे सचिव आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री कुर्डुनकर आर एम,माजी कार्यवाह मा.श्री प्रभाकर सागवेकर,माजी उपाध्यक्ष मा.श्री गजानन धामणस्कर,लोहारे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री दीपक कुर्डुनकर,संस्था सदस्य व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गंगाधर साळवी,सारथी शेतकरी मंडळ अध्यक्ष श्री गणेश कुर्डुनकर,वसतिगृह अधीक्षक श्री दीपेश जाधव इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री कुर्डुनकर सर यांनी वसतिगृहातील अनुदानित आणि विनाअनुदानित प्रवेशासंबंधी विस्तृत माहिती दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अनुदानित व विनाअनुदानित असे एकूण १५ नवीन विद्यार्थी प्रवेश निश्चित झाले. सदर शिबिरास महाड तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक चळवळीतील ऍड श्री बिपीन साळवे, दीपक मोरे,सुरेश साळवी,आदर्श शेतकरी संजय सोनावणे,आरडीसीसी महाड बँकेचे निवृत्त शाखाधिकारी बाळाराम धोत्रे,दिलीप तांबे,निवृत्त सैनिक आनंद हाटे, शांताराम सकपाळ,सागर पाटील,सौ पूजा सुतार,श्री प्रदीप साळवी व सौ मनीषा साळवी,पत्रकार नितेश लोखंडे,निलेश लोखंडे,नितीन कांबळे,विष्णू वाघमारे,गणेश जाधव इत्यादी उपस्थित होते. प्रोजेक्टरद्वारे प्रसारित केलेले वसतिगृहातील शैक्षणिक व्हिडिओ पाहून व माहिती ऐकून या वसतिगृहातील शैक्षणिक वतावरणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील दुर्बल गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. याप्रसंगी सुरेश साळवी,पालक श्री प्रदीप साळवी यांनी मनोगत व्यक्त केले तर कुमार मंथन पाते या विद्यार्थ्याने वसतिगृहातील अनुभव कथन केले. कुमार अनुप राजन कुर्डुनकर यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी तांत्रिक बाबी अतिशय छान सांभाळल्या तर शिक्षक गणेश कोळी सर,सौ घरटकर मॅडम,राऊत मॅडम,गायकवाड एस के,मोरे सी एस यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री गंगाधर साळवी सर यांनी सुत्रसंचालन केले तर वसतिगृह अधीक्षक श्री दीपेश जाधव सर यांनी आभार मानले.
