रायगड लोकधारा वृत्त :
मुंबई प्रतिनीधी- सतिश वि.पाटील : सध्या ‘घिबली’फोटो ट्रेंड’ सुरू असून अनेकांची छायाचित्र तयार करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मात्र, हाच ‘ट्रेंड’ सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत असून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक करीत आहेत. ‘मेक अ घीबली फोटो,’ अशा आशयाची ‘लिंक’ पाठवून बँक खाते रिकामे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून ‘चॅटजीपीटी’ने ‘घीबली फोटो ट्रेंड’ आणला आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर ‘घीबली स्टाईल फोटों’नी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण आपले जुने छायाचित्र ‘घीबली स्टाईल’ करून समाजमाध्यमांवर टाकत आहे. त्यामुळे ‘घीबली’ छायाचित्र औत्सुक्याचा विषय ठरत आहे.
मात्र, या ‘ट्रेंड’चा गैरफायदा सायबर गुन्हेगार उचलत आहे. ‘घीबली’ छायाचित्रांच्या प्रेमात पडलेल्या अनेकांना छायाचित्र बनवण्याची ओढ आहे. मात्र, ते कसे बनवावे?, याची पुरेपूर माहिती नाही. सायबर गुन्हेगार फेसबुक, यू-ट्युब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर बनावट ‘लिंक’ टाकतात. ‘असा बनवा घीबली फोटो’ असे लिहितात. त्यामुळे अनेक जण नव्या ‘ट्रेंड’मध्ये सामील होण्यासाठी समाजमाध्यमांवर आलेल्या ‘लिंकवर क्लिक’ करतात. ‘लिंक’वर ‘क्लिक’ करताच ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. ‘लिंक’मध्ये बँकेला जुळलेला भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती विचारण्यात येते. अनेक जण ही माहिती भरतात. सायबर गुन्हेगार काही वेळातच बँक खात्यातून काही रक्कम काढतात. तसेच लिंकवर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनी ‘हॅक’ करतात. भ्रमणध्वनीमधील माहिती चोरतात. तसेच ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर ताबा मिळवतात. बँक खात्यातून पैसे परस्पर काढल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून ‘घीबल फोटो ट्रेंड’ अनेकांच्या अंगलट येत आहे.
छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता….


