रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली वार्ताहर (अविनाश जाधव):- न्हावाशेवा ते शिवडी अटल सेतू वरून वरळी कडे जाण्यासाठी एम एम आर डी कडून बांधत असलेल्या शिवडी वरळी उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हा उन्नत मार्ग ईस्टर्न फ्री वे शिवडी रेल्वे, शिवडी डेपो,आचार धोंडेमार्ग, प्रभादेवी एलपीस्टन रेल्वे पूल मार्गेतून तो वरळी येथे पोहोचतो.
या उन्नत मार्गे साठी जुना एलफिस्टन ब्रिज तोडून त्याजागी डबल डेकर ब्रिज बनणार आहे. हा ब्रीज बनवण्यासाठी जुना ब्रिज बंद बंद करण्यासाठी वाहतूक वळवलेले आहे त्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षाने एक नोटीस जारी केली आहे. हा ब्रिज दिनांक 15/04 /2025 रोजी पासून बंद असणार आहे
या उन्नत मार्गामध्ये येणाऱ्या रहिवाशांचे होणार प्रभादेवी रेल्वे पुलाच्या बाजूच्या रहिवाशांचे नागरिकांना ये जा करणे कसे होणार, रेल्वे ब्रिज कधी ओपन करणार, आंबेडकर रोड वरती रहिवाशांच्या समस्या, प्रभादेवी पश्चिम बाजू कडून केम रुग्णालय, वाडीया रुग्णालय, टाटा रुग्णालय कडे कसे यायचे याबाबत, एम एम आर डी चे अधिकारी हा ब्रिज कधी ओपन करणार यावरती एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण दिनांक 15 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवडी मतदारसंघ व स्थानिक रहिवाशाकडून एक दिवसीय साखळी उपोषणाच्या आयोजन.
या सर्व प्रश्नावर सरकारने लक्ष द्यावे व अधिकारी तसेच प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर हा मार्ग खुला करावा. हा उन्नत मार्ग अडचणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी मतदार संघ व स्थानिक रहिवाशांनी उद्या दिनांक १५/०४/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय साखळी उपोषण करणार आहेत. हे उपोषण दोन जागी होणार आहे १) राष्ट्रीय हॉटेल समोर शिवडी नाका आणि २) गौरीशंकर मिठाईवाल्यासमोर परळ नाका येथे. तरी साखळी उपोषणा करता नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट शिवडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी केले आहे.
