रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली वार्ताहर – अविनाश जाधव : एम एम आर डी ने बनवलेल्या पनवेल न्हावाशेवा ते शिवडी समुद्री मार्गाचे विस्तारीकरण करून हा मार्ग पुढे मार्गस्थ होऊन शिवडी ते एलफिस्टन रोड मार्गे वरळी येथे उन्नत मार्ग करण्यात येत आहे. शिवडी वरळी उन्नत मार्गासाठी आणि पश्चिम रेल्वे ला जोडणारा स्थानकाजवळील प्रभादेवी एलफिस्टन उड्डाणपूला जुना पूल पाडण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल डबल डेकर बांधण्यात येणार आहे त्यासाठी हा फुल बंद करून पूर पाडण्याच्या कामाला परवानगी देण्याकरिता वाहतूक पोलिसांकडून आणणे नागरिकाकडून सूचना ना हरकती मागवण्यात आले आहेत. वाहतूक हे कोणत्या मार्गाने कशी वळवावी , वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग याची नागरिकांना योग्य ते सूचना देऊन हा मार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक नियोजन मुख्यालय वरळी यांनी दिनांक 15 4 2025 ते 31 12 2026 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ह्या मार्गावरती एमएमआरडी कडून वाहतूक नियंत्रण कक्षा योग्य ते सहकार्य करण्यात यावे.
