रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी :वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.कुर्डुनकर आर एम सर यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिवादन केले. यावेळी कुमार संकल्प सोनावणे,अथर्व वाघे,रोशन शिंदे,आर्या साळवी या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर स्वतः लिहिलेल्या कवितांचे सादरीकरण केले. तर सायना नवले:लाल दिव्याच्या गाडीला,मंथन पाते:आई म्हणे लेकराला,श्लोक जाधव:सोन्यान भरली ओटी,रुद्र जाधव:जगात गाजा वाजा या विद्यार्थ्यांनी ही गीते गायली. रिद्धी धाडवे,मृणाली गोसावी,आर्यन पवार,युवराज चंदूरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भाषणे केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुर्डुननकर सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती देऊन त्यांनी केलेले कष्ट,अभ्यासावर दिलेले लक्ष,देशासाठी लिहिलेले संविधान,महिलांसाठी आणि बहुजन समाजासाठी दिलेले योगदान याचा विचार करता विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मनोगतात म्हटले. तर विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गंगाधर साळवी सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण,शिक्षण याविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन केले पाहिजेआपल्या घरी पुस्तकांचे कपाट तयार करून त्यात।किमतीची सध्या कमी किमतीची पुस्तके स्वतः विकत घेतली पाहिजे असे ते हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आर्या नामदेव साळवी आणि सायना सचिन नवले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दीपेश जाधव सर यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ घरटकर मॅडम,मीनाक्षी राऊत मॅडम,श्री गायकवाड एस के इत्यादी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले.
