रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर : पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीचा पदनियुक्ती सोहळा रविवार दिनांक 13 एप्रिल 25 रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे संपन्न झाला. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पदाधिकारी निवड प्रक्रिये वेळी उपस्थित सदस्यांना पत्रकार निवडपत्र दिले. यावेळी साप्ताहिक आवाज कोकणचा पुणे उपसंपादक श्री राम जाधव व श्री. रोहिदास जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर श्री. दिलीप गायकर यांची प्रदेश सदस्य व श्री. ज्ञानेश्वर कोळी यांची प्रदेश सहसचिव सदस्य पदी निवड करण्यात आली.
कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तीरपणकर आणि साप्ताहिक रायगड दर्पणचे मालक, मुद्रक व प्रकाशक डॉन एन के के यांची प्रदेश संघटक पदी निवड जाहीर करण्यात आली. कोकण विभाग अध्यक्ष पदी साप्ताहिक सत्याची वाटचालचे धडाडीचे पत्रकार श्री गोविंद धर्मा जोशी तर कार्याध्यक्ष पदी श्री. अलंकार भोईर व सचिवपदी एकनाथ सांगळे यांची निवड झाली. रायगड जिल्हा अध्यक्ष पदी आवाज महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, कार्याध्यक्ष पदी साप्ताहिक आर्या प्रहार चे संपादक श्री सुधीर पाटील व सचिव पदी श्री अशोक घरत , सहसचिव पदी श्री. राजेंद्र होळकर तर सदस्य म्हणून आदित्य वाघ यांची निवड झाली.
नवी मुंबई अध्यक्ष पदी निलेश उपाध्याय व सदस्य पदी तुषार पाटील यांची निवड करण्यात आली. साप्ताहिक आर्या प्रहार चे प्रतिनिधी श्री. ऋषिकेश थळे यांची अलिबाग तालुका अध्यक्ष पदी, पनवेल तालुका अध्यक्ष पदी श्री संतोष जांभळे खालापूर तालुका अध्यक्ष पदी श्री राजू नायक व उपाध्यक्ष पदी श्री संजय नगीना गुप्ता तर पेण तालुका अध्यक्ष पदी आई चॅनलचे संपादक श्री अक्षय पाटील, कार्याध्यक्ष पदी, श्री अरुण चवरकर व सदस्य पदी श्री. अमोल येरणकर, जय शिवराय चॅनलच्या संपादिका व डॅशिंग पत्रकार सौ. पूजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी सौ सुनीता सानप व पनवेल तालुका अध्यक्ष पदी सौ तेजश्री रघुवीर यांची निवड करण्यात आली. १६ मे २०१६ साली स्थापन झालेल्या या पत्रकार संघटनेला नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण होणार आहे.आणि त्यानिमित वर्षभरात पत्रकारिता आणि अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पत्रकार उत्कर्ष समितीकडून पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांसाठी अपघाती विंमा योजना, कोविड काळात मोफत ॲम्बुलन्स सुविधा, मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, नवदुर्गा सन्मान, वर्षा सहल, आरती पुस्तकांचे वाटप, स्मरणिका असे अनेक उपक्रम राबविले जातात. यापुढे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. आणि सर्व पत्रकारांना सोबत घेऊन ,त्यांचा योग्य सन्मान ठेवून हे कार्यक्रम करण्यात येतील अशी घोषणा डॉ अशोक म्हात्रे यांनी करताच उपस्थित पत्रकारांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.येत्या वर्षभरात करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर समितीमध्ये राज्यातील 300 हून अधिक पत्रकारांचा समावेश असून 70 हून अधिक महिला पत्रकार आहेत. समिती सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार श्री. शैलेश ठाकूर व सर्वच सदस्य पदाधिकारी यांच्या अथक परिश्रम व सहकार्यामुळे समितीचे जाळे राज्यभरात जोमाने पसरत आहे.
