रायगड लोकधारा वृत्त
मुंबई प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर : महाराष्ट्र राज्य लॉटरी ही पारदर्शक असून देशभरातील आदर्श लॉटरी आहे. आता विक्रेत्यांनी सर्वाधिक विक्रीसाठी पद्धतशीर व प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया ५६ व्या राज्य लॉटरी वर्धापनदिन कार्यक्रमात लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाची गौरवशाली परंपरा असलेल्या राज्य लॉटरीच्या ५६ व्या वर्धापनदिना निमित्याने विक्रेत्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत असतांनाच यापूढे लॉटरीची विक्रमी विक्री होण्यासाठी सार्यांनी प्राधान्याने प्रयत्न करावेत!, अशी अपेक्षा लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य लॉटरीचा ५६ वा वर्धापनदिन सोहळा नुकताच मंत्रालयात लॉटरी आयुक्तांच्या दालनात साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार बोलत होत्या लॉटरी विक्रेत्या संघटनेचे ज्येष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी आयुक्तांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वर्धापन दिना निमित्य खास प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दिव्यपथ या सुमीत सातार्डेकर संपादीत विशेषांकाचेही प्रकाशन आयुक्तांच्या हस्ते करणार आले. राज्य लॉटरीच्या बंदीचे संकट जरी आज टळले असले तरीही विक्रेत्यांनी आता सर्वाधिक विक्रीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत त्यामूळे अर्थचक्र सूरळीत सुरू राहील, असे सांगून आयुक्तांनी लॉटरी विक्रेत्यांचे आभार मानले. लॉटरी उपसंचालक आनंद जोशी यांचे आभार यावेळी वितरक, विक्रेते स्नेहल शाह यांनी मानले वर्धापन दिन सोहळ्यानिमित्याने आयुक्त दालनाची सजावट करण्यात आली होती. तसेच वर्धापनदिन केक कापून या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी लॉटरी संघटनेचे सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, लॉटरी विभागाच्या कक्ष अधिकारी शीला यादव, कक्ष अधिकारी रोहित सोनवणे, लेखा अधिकारी संदेश ओहाळ व संबंधित सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
वर्धापनदिन विशेषांक ‘ दिव्यपथ चे वितरण यावेळी करण्यात आले. संग्राहय व परिपूर्ण विशेषांक असल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकारी आणि विक्रेत्यांच्या प्रतिनिधांनी यावेळी व्यक्त केली. विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
